शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तरुण विजय यांच्यावर कारवाईची मागणी

By admin | Updated: April 10, 2017 23:55 IST

भाजपचे नेते तरुण विजय यांनी केलेल्या कथित वांशिक वक्तव्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी लोकसभेत विरोधकांनी सोमवारी केली.

नवी दिल्ली : भाजपचे नेते तरुण विजय यांनी केलेल्या कथित वांशिक वक्तव्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी लोकसभेत विरोधकांनी सोमवारी केली. तत्पूर्वी, कोणालाही जात व त्याच्या कातडीच्या रंगावरून भेदभावाची वागणूक दिली जाणार नाही, असे आश्वासन सरकारने दिले होते. तापलेले वातावरण शांत करण्यासाठी गृहमंत्री राजनाथ सिंह आणि संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी तरुण विजय यांनी आधीच क्षमा मागितलेली असून देश धर्मनिरपेक्ष आहे, असे सांगितले. विरोधी सदस्यांनी जोरजोरात आरडाओरड करायला सुरवात केली व त्यांनी तरुण विजय यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली. या गोंधळामुळे कामकाज तीन वेळा तहकूब करावे लागले.तरूण विजय यांची शेरेबाजी ही देशाच्या ऐक्याला धोका असून तुम्हाला हा देश तोडायचा आहे. या गोष्टी अशाच घडत गेल्या तर राज्ये स्वातंत्र्याची मागणी करतील, असा इशारा काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी दिला. यावरून तुमची मानसिकता दिसते, असे सांगून तरूण विजय यांच्या त्या वक्तव्याची तुलना खरगे यांनी हिटलरशी केली व त्यांचा निषेध केला. त्यावर राजनाथ सिंह यांनी भारत देश धर्मनिरपेक्ष असून कोणालाही जात, वंश आणि धर्माच्या आधारे पक्षपाती वागणूक दिली जाणार नाही. विजय यांनी स्वत:च त्यांचे ते वक्तव्य समर्थनीय नाही असे म्हणून क्षमा मागितली आहे, असे सांगितले. तरीही घोषणा सुरूच राहिल्यावर अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी हे सभागृह काही न्यायालय नाही, असे म्हटले. ते भारतीय नाहीत? - या मुद्यावर सत्ताधाऱ्यांवर हल्ला करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की दक्षिण भारतातून आलेले लोक भारतीय नागरिक नाहीत का? आम्ही भारतीय आहोत की नाही हे मला समजले पाहिजे. तरूण विजय ही काही सामान्य व्यक्ती नाही त्यामुळे त्यांच्यावर काय कारवाई केली हे समजले पाहिजे.कारण तरूण विजय हे माजी राज्यसभा सदस्य असून भाजपच्या तत्वज्ञानावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत, असे खरगे म्हणाले.