शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नार्को चाचणी करण्याची कथुआ प्रकरणातील आरोपींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 23:44 IST

जम्मू-काश्मीरमधील कथुआ येथे जानेवारी महिन्यात आठ वर्षांच्या बालिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक केलेल्या आठ आरोपींनी गुन्हा कबुल नसल्याचा दावा करुन आमची नार्को चाचणी घेण्यात यावी असे न्यायालयाला सोमवारी सांगितले.

कथुआ : जम्मू-काश्मीरमधील कथुआ येथे जानेवारी महिन्यात आठ वर्षांच्या बालिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक केलेल्या आठ आरोपींनी गुन्हा कबुल नसल्याचा दावा करुन आमची नार्को चाचणी घेण्यात यावी असे न्यायालयाला सोमवारी सांगितले.या बलात्कार प्रकरणामुळे देशात संतापाची लाट उसळली असून आठ आरोपींपैकी सात जणांना जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय गुप्ता यांच्यासमोर हजर करण्यात आले. क्राइम ब्रँचने जे आरोपपत्र दाखल केले आहे त्याच्या प्रती आरोपींना द्याव्यात असा आदेश न्यायालयाने दिला. या खटल्याची पुढील सुनावणी २८ एप्रिलला होणार आहे. बलात्कार प्रकरणातील आठवा आरोपी अल्पवयीन असून त्याने जामीन मिळण्यासाठी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे. त्याची सुनावणी २६ एप्रिलला होणार आहे.बकरवाल या भटक्या जमातीतील असलेल्या बालिकेला कथुआ जिल्ह्यातील एका गावातल्या मंदिरात आठवडाभर कोंडून ठेवले व तिच्यावर या आरोपींनी बलात्कार केला. या अनन्वित अत्याचारामुळे ती बालिका मरण पावली. या प्रकरणातील आरोपींनी आपली नार्को चाचणी करण्यात यावी अशी विनंती न्यायाधीशांना केली. या प्रकरणातील आरोपी असलेला पोलिस अधिकारी दीपक खजुरिया याने तर नार्को चाचणी व सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली आहे.न्यायालय परिसरात कडक बंदोबस्तया आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले गेले त्यावेळी या परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या प्रकरणी अटक केलेल्यांच्या विरोधात क्राइम ब्रँचला ९ एप्रिल रोजी स्थानिक बार असोसिएशनच्या सदस्यांनी आरोपपत्र दाखल करु दिले नव्हते. तेव्हापासून तणावाचे निर्माण झाला होता.१२ दिवसांनी वकील रूजूआरोपींना वाचवण्यासाठी केलेल्या १२ दिवसांच्या आंदोलनानंतर जम्मू हायकोर्ट बार असोसिएशनच्या वकिलांनी पुन्हा काम सुरू केले आहे. असोसिएशनचे अध्यक्ष बी.एस. स्लाथिया यांनी ही माहिती दिली.जीवे मारले जाण्याची किंवाबलात्कार होण्याची वकिलाला भीतीनवी दिल्ली : आपल्या जीवाला धोका असल्याची किंवा बलात्कारही केला जाण्याची भीती कथुआ प्रकरणातील बालिकेच्या कुटुंबियांच्या वतीने खटला लढविणारी वकील दीपिका सिंग राजावत हिने व्यक्त केली आहे. आपल्यावर सामाजिक बहिष्कारही टाकला जाऊ शकतो असे सांगून ती पुढे म्हणाली की, काही जणांनी मला हिंदूविरोधी ठरविले असून कदाचित ते न्यायालयात वकीलीही करु देणार नाहीत. मला व कुटुंबियांना पोलिसांनी सुरक्षा पुरवावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचेही दीपिकाने सांगितले.

टॅग्स :Kathua Rape Caseकठुआ बलात्कार प्रकरणCourtन्यायालय