बोकारो (झारखंड) : तेनुघाट धरणातील पाणी सोडल्याने शुक्रवारी दामोदरी नदीत अडकलेल्या दहा मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तब्बल आठ तासांच्या बचाव मोहिमेनंतर या मुलांचे प्राण वाचविण्यात यश आले.
चंद्रपुरा थर्मल पॉवर स्टेशनद्वारे निर्मित दगडी पहाडावर चढून मुलांनी स्वत:ला संकटमुक्त केले. पचौरा गावातील ही घटना हिमाचल प्रदेशात नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेचे स्मरण करून देणारी होती.
बोकारोचे उपायुक्त उमाशंकर सिंह यांनी आज शनिवारी या घटनेची माहिती देताना सांगितले की, जवळच्याच गावात राहणारी 15-16 वर्षेवयोगटातील ही मुले नदीत अंघोळीसाठी गेली असताना तेनुघाट धरणातून पाणी सोडण्यात आले आणि नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढली.
हे सर्व जण नदीतीलच पॉवर स्टेशनच्या पहाडावर चढले होते. तेथून त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. ही बचाव मोहीम रात्री 11.3क् र्पयत चालली. (वृत्तसंस्था)
4हिमाचल प्रदेशात जलविद्युत प्रकल्पाच्या अधिका:यांनी अचानक पाणी सोडल्याने हैदराबादेतून आलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 25 विद्याथ्र्याना जलसमाधी मिळाली होती. त्यातील काहींचे मृतदेह अद्यापही मिळालेले नाहीत.
धरणातून पाणी सोडल्याने दामोदरी नदीत अडकलेल्या मुलांनी नदीतील दगडी चबुत:यावर चढून स्वत:चा बचाव केला.