शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

भारत जगात भारी! देशातील सर्वात मोठ्या कोविड सेंटरमध्ये आता परदेशी रुग्णांवर उपचार

By मोरेश्वर येरम | Updated: January 12, 2021 17:18 IST

सरदर पटेल जम्बो कोविड सेंटरमध्ये आतापर्यंत दुबई, नेदरलँड, जपान, मलेशिया आणि कॅनाडातून रुग्ण दाखल

ठळक मुद्देदिल्लीच्या कोविड सेंटरमध्येही आता खाटा रिकाम्या होऊ लागल्या आहेत.दिल्लीच्या कोविड सेंटरमध्ये सध्या ६० रुग्ण असून त्यासाठी ६०० डॉक्टरांची फौजकेंद्र सरकारने या कोविड सेंटरमध्ये परदेशी रुग्णांवर उपचार करण्याचे ठरवले

नवी दिल्लीदिल्लीत काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा कहर सुरू होता. पण आता हळूहळू चित्र पालटलं आहे. दिल्लीत कोरोनाचा उद्रेक झाला त्यावेळी छत्तरपूर येथे देशातील सर्वात मोठे सरदार पटेल जम्बो कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. विशेष म्हणजे, इंडो-तिबेटीयन पोलिसांकडून (आयटीबीपी) येथे रुग्णांना सेवा दिली जात होती. 

देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना या कोविड सेंटरमध्येही आता खाटा रिकाम्या होऊ लागल्या आहेत. "सरदार पटेल कोविड सेंटरमधील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. कोविड सेंटरमध्ये सध्या ६० रुग्ण असून त्यासाठी ६०० डॉक्टरांची फौज कार्यरत आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने या कोविड सेंटरमध्ये परदेशी रुग्णांवर उपचार करण्याचे ठरवले आहे", असं 'आयटीबीपी'च्या अधिकाऱ्याने सांगितले. 

सरदर पटेल जम्बो कोविड सेंटरमध्ये आतापर्यंत दुबई, नेदरलँड, जपान, मलेशिया आणि कॅनाडातून आलेल्या कोरोनाच्या रुग्णांना दाखल करुन घेण्यात आले आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याने आता हळूहळू या सेंटरमधील डॉक्टरांचीही संख्या कमी केली जात आहे. 

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा एकही रुग्ण या सेंटरमध्ये दाखल झालेला नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. परदेशी रुग्णांमध्ये सौदी अरेबियाच्या ८, दुबईच्या ४, कॅनडाच्या ३ आणि अमेरिका, जपान, मलेशिया, नेदरलँड, म्यानमारच्या प्रत्येक एका रुग्णाचा समावेश आहे. 

भारतातील रुग्ण संख्येत मोठी घटसात महिन्यांनतर भारतात बुधवारी सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. गेल्या २४ तासांत भारतात कोरोनाचे १२,५८४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. याआधी भारतात दिवसाला एका दिवसात ५० हजार नवे रुग्ण आढळून येत होते. 

देशात गेल्या २४ तासांत एकूण १८, ३८५ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात १,५१,३२७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसdelhiदिल्लीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या