शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Violence: शांतता, तणाव आणि आरोप-प्रत्यारोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 02:25 IST

हिंसाचारावरून नेत्यांनी राजकारण सुरू केले असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

- विकास झाडे नवी दिल्ली : दिल्ली गुरुवारी शांत होती. सुरक्षा चोख असली तरी तीन दिवसांतील हिंसक घटनांचा थरकाप कायम आहे. मृतांचा आकडा वाढत आहे. किती मारले गेले याचा निश्चित आकडा पोलीसही सांगून शकत नाहीत. नाल्यांतून रोज मृतदेह काढले जात आहेत. या हिंसाचारावरून नेत्यांनी राजकारण सुरू केले असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.ईशान्य दिल्लीत पोलीस व अर्धसैनिक दलाच्या ड्रोन कॅमेऱ्यांमुळे दिलासा आहे. बुधवारी रात्रभर संदवेनशील ठिकाणी ड्रोनचा पहारा होता. त्यामुळे भीती थोडी कमी झाली आहे. परिसरातील लोकही पोलिसांना सहकार्य करीत आहे. कुठे हिंसाचाराची शक्यता दिसल्यास पोलिसांना माहिती देत आहेत. दंगेखोरांना सोडू नका अशीच सर्व धर्मांच्या लोकांची भूमिका आहे.या भागांतील बाजारपेठा बंद आहेत. शाळा, खासगी रुग्णालये, बॅँकाही बंद आहेत. लोकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळण्यात अडचणी येत आहेत. दुधासाठी भांडी घेऊन लोक फिरत आहेत. काहींवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. जाळपोळीमुळे वाहने व घरांचे सांगाडे सर्वत्र दिसत आहेत. त्यामुळे परिसर भकास आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दंगलग्रस्त भागातील लोकांना जेवण पाठविण्यास सुरूवात केली आहे.सार्वजनिक वाहतूक बंद झाल्याने लोकांची गैरसोय झाली आहे. या परिसरातील मेट्रो स्टेशन आज सुरू झाल्याने लोक घराबाहेर पडतील, असे सुरक्षा यंत्रणेला वाटते. आम्ही एकही गोळी झाडली नसल्याचा पोलिसांचा दावा आहे. परंतु हजारावर गोळ्या झाडल्याचे स्पष्ट आहे. या गोळ्या आल्या कुठून हे गुलदस्त्यात आहे. दोनशेवर लोक जखमी झालेत. बळी गेले, तेही बहुतांशी गोळीबारातच अनेक भागांत एवढे दगड-विटा आले कसे, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

टॅग्स :delhi violenceदिल्ली