नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील हिंसाचाराचा वणवा शमला असला तरी तणावपूर्ण परिस्थिती कायम आहे. जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मृतांची संख्या ४२ वर पोहोचली आहे.शुक्रवारी अनुचित घटना घडली नाही. हिंसाग्रस्त भागातील स्थिती सुधारत असून जीवनावश्यक वस्तूही मिळत आहेत. तिथे ७ हजार सशस्त्र पोलीस व निमलष्करी जवान तैनात आहेत. घरे जळालेल्यांना २५ हजार रुपयांची मदत देणे सुरू आहे. या हिंसाचारात ५०० हून अधिक वाहने जळाली, ५२ दुकाने लुटण्यात आली. परिस्थितीत सुधारणा झाल्याने जमावबंदी आज शिथिल करण्यात आली होती.
Delhi Violence: दिल्ली पूर्वपदावर, मृतांची संख्या ४२
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 06:57 IST