शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

Delhi violence: 26 जानेवारीच्या हिंसाचाराची स्क्रिप्ट आधीपासूनच तयार होती!; SITच्या चौकशीत मोठा खुलासा 

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: February 6, 2021 09:37 IST

दिल्ली पोलिसांनी उपद्रवी इकबाल सिंगवर 50 हजार रुपयांचे बक्षी ठेवले आहे. तो या कटातील महत्वाचा मोहरा असल्याचे सागंण्यात येत आहे. (Delhi violence SIT investigation)

ठळक मुद्देसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपद्रव करण्यासाठी काही विशेष गटांना लाल किल्ला आणि आयटीओवर एकत्र होण्यास सांगण्यात आले होते.इकबाल सिंग हा या कटातील महत्वाचा मोहरा असल्याचे सागंण्यात येत आहे.हिंसाचार प्रकरणात 124 हून अधिक लोकांना अटक

नवी दिल्ली - 26 जानेवारीला दिल्ली आणि लाल किल्ल्यावर झालेल्या उपद्रवाचा कट आधीपासून ठरवण्यात आला होता. असा धक्कादायक खुलासा दिल्ली पोलीस क्राईम ब्रांचच्या SIT चौकशीतून समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपद्रव करण्यासाठी काही विशेष गटांना लाल किल्ला आणि आयटीओवर एकत्र होण्यास सांगण्यात आले होते. यांचा उद्देश आंदोलकांमध्ये उपस्थित राहून उपद्रव सुरू करणे आणि नंतर आंदोलन कर्त्यांना उपद्रवात सामील करणे, असा होता. (script of the january 26 violence was prepared before)

इकबाल सिंगच्या चिथावनीवरून तोडला गेला लाहौर दरवाजा - पोलिसांतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी उपद्रवी इकबाल सिंगवर 50 हजार रुपयांचे बक्षी ठेवले आहे. तो या कटातील महत्वाचा मोहरा असल्याचे सागंण्यात येत आहे. त्यानेच लाल किल्ल्यात जमाव जमवला आणि त्यांना लाहोर दरवाजा तोडण्यासाठी भडकावले. यानंतरच उपद्रवी जमावाने लाल किल्ल्याचा लाहोर दरवाजा तोडला. तसेच लाल किल्ल्यावर सर्वात वर आपल्या धर्माचा झेंडा फडकावण्याची त्यांची इच्छा होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या व्हिडिओमध्ये इकबाल सिंग दिसत आहे, त्यावरूनही तो जमावाला भडकावत असल्याचे स्पष्ट होत आहे. एवढेच नाही, तर त्याच्या सोबत इतरही काही लोक उपस्तित होते. ते सर्व जण जमावाला भडकावण्याचेच काम करत होते.

हिंसाचार प्रकरणात 124 हून अधिक लोकांना अटक -दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचची SIT 26 जानेवारीला झालेल्या हिंसाचाराची चौकशी करत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तब्बल 124 जणांना अटक केली आहे. तर 44 FIR दाखल करण्यात आल्या आहेत. संबंधित 44 प्रकरणांपैकी 14 प्रकरणांचा तपास SIT करत आहे. या शिवाय पोलिसांकडून 70 हून अधिक लोकांचे फोटोही जारी करण्यात आले आहेत.

ग्रेटाचं 'ते' ट्विट -पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनाचे सनर्थन करणारे ट्विट केले. भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामागे आम्ही एकजुटीने उभे आहोत, असे ग्रेटाने ट्विटमध्ये म्हटले होते. याच बरोबर तिने आणखी एक ट्विट केले होते. या सोबत तीने एक डॉक्युमेंटदेखील शेअर केले होते. यात भारत सरकारवर आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करण्यासाठीची रणनीती नमूद करण्यात आली होती. तसेच आंदोलनाचे प्लॅनिंगही करण्यात आले होते. भारतावर पाच टप्प्यांमध्ये दबाव आणण्याचा उल्लेख यामध्ये होता. मात्र, चूक लक्षात आल्यानर ग्रेटाने हे ट्विट थोड्याच वेळात डिलीट केले.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनFarmer strikeशेतकरी संपPoliceपोलिसRed Fortलाल किल्लाdelhi violenceदिल्ली