शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Violence : न्यायाधीशांच्या मध्यरात्री केलेल्या बदलीविरोधात प्रियंका गांधींची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 10:42 IST

Priyanka Gandhi : सध्याच्या वातावरणात न्यायमूर्ती मुरलीधर यांच्या ऐन मध्यरात्री करण्यात आलेली बदली तशी धक्कादायक नाही

ठळक मुद्देसध्याच्या वातावरणात न्यायमूर्ती मुरलीधर यांच्या ऐन मध्यरात्री करण्यात आलेली बदली तशी धक्कादायक नाहीन्यायमूर्तींची बदली ही खेदजनक आणि लाजीरवाणी बाब सरकार असे प्रकार करून न्यायाचे तोंड बंद करू पाहत आहे

नवी दिल्ली - दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारावरून दिल्ली पोलिसांना खडेबोल सुनावणारे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांची मध्यरात्री बदली करण्यात आली. दरम्यान, या बदलीविरोधात काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सरकार न्यायाचे तोंड बंद करू पाहत आहे, अशा शब्दात त्यांनी न्यायमूर्तींची बदली करणाऱ्या केंद्र सरकारवर टीकास्र सोडले आहे.

न्यायमूर्ती मुरलीधर यांच्या बदलीचा निषेध करणारे ट्विट प्रियंका गांधी यांनी केले आहे. त्यात त्या म्हणतात, ‘सध्याच्या वातावरणात न्यायमूर्ती मुरलीधर यांच्या ऐन मध्यरात्री करण्यात आलेली बदली तशी धक्कादायक नाही. पण ती खेदजनक आणि लाजीरवाणी बाब आहे. देशातील कोट्यवधी लोकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. मात्र सरकार असे प्रकार करून न्यायाचे तोंड बंद करू पाहत आहे.’

दरम्यान,  दिल्लीत सुरु असणाऱ्या हिंसाचाराबाबतच्या सुनावणीवेळी दिल्ली पोलिसांवर ताशेरे ओढणाऱ्या न्यायाधीश एस मुरलीधर यांची बदली दिल्ली हायकोर्टातून पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनमधून न्यायाधीश एस. मुरलीधर यांच्या बदलीची अधिसूचना जारी करण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर न्यायाधीश एस, मुरलीधर यांची बदली पंजाब हरियाणा हायकोर्टात केली. माहितीनुसार सुप्रीम कोर्टाच्या समितीने १२ फेब्रुवारीला दिल्ली हायकोर्टातील न्यायाधीश एस मुरलीधर यांची बदली पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात करण्याची शिफारस केली होती. 

संबंधित बातम्या 

Delhi Violence: हिंसाचार प्रकरणावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीश एस. मुरलीधर यांची तातडीनं बदली, कारण...

Delhi Violence : आग का क्या है, पल दो पल मे लगती है..., राहत इंदौरींचा भावुक शेर

Delhi Violence : दिल्लीतील हिंसाचारावर रोहित शर्मानं व्यक्त केली चिंता, म्हणाला...

 नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू झालेल्या आंदोलनादरम्यान दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारामुळे जखमी झालेल्या व्यक्तींचे संरक्षण आणि चांगल्या उपचारांसाठी दिल्ली हायकोर्टातील न्यायमूर्ती मुरलीधर यांच्या निवासस्थानी मध्यरात्री सुनावणी झाली होती. मुस्तफाबादमधील एका रुग्णालयातून अॅम्ब्युलन्ससाठी सुरक्षित रस्ता देण्यात यावा, तसेच जखमींना सरकारी रुग्णालयात पाठवावे, असे निर्देश कोर्टाने दिल्ली पोलिसांना दिले होते.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसdelhi violenceदिल्ली