शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Violence: दिल्ली हायकोर्टात न्यायाधीश बदलताच दृष्टिकोनही बदलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 06:52 IST

सुनावणीत अनुभव; खंडपीठ बदलताच मेहतांचे म्हणणे मान्य करून सुनावणी १३ एप्रिलपर्यंत तहकूब

नवी दिल्ली : न्यायालयापुढील याचिकेतील मुद्दे व त्यावर वकिलांनी केलेले युक्तिवाद तेच असले तरी त्याकडे पाहण्याचा न्यायाधीशांचा दृष्टिकोन परस्परविरोधी असू शकतो याचा अनुभव दिल्लीतील हिंसाचाराच्या संदर्भात कथित प्रक्षोभक भाषण करणाऱ्या भाजपा नेत्यांविरुद्ध गुन्हे नोंदविण्याच्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात दोन दिवसांत आला.भाजपच्या अनुराग ठाकूर, कपिल मिश्रा, प्रवेश वर्मा व अभय वर्मा या नेत्यांविरुद्ध गुन्हे नोंदविले जावेत यासाठीे यासाठी याचिका केली गेली आहे. तिच्यावर बुधवारी न्या. एस. मुरलीधरन व न्या. तलवंत सिंग यांच्या खंडपीठापुढे तर गुरुवारी मुख्य न्यायाधीश न्या. डी. एन. पटेल व न्या. सी. हरिशंकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.या दोन्ही खंडपीठांपुढे याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील कॉलिन गोन्साल्विस यांनी तर दिल्ली व केंद्र सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केलेले युक्तिवाद सारखेच होते. पण त्याकडे पाहण्याचा दोन्ही खंडपीठांचे दृष्टिकोन भन्न दिसले. गोन्साल्विस यांनी तातडीने गुन्हे नोंदविण्याचा आग्रह धरला, तर सध्याची परिस्थिती गुन्हे नोंदविण्यास अनुकूल नाही. परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर कारवाई केली जाईल, असे मेहता यांचे म्हणणे होते.न्या. मुरलीधरन यांनी मेहता यांचे म्हणणे अमान्य केले आणि मेहता व विशेष पोलीस यांना प्रक्षोभक भाषणांचे व्हिडिओ पाहायला लावले. न्या. मुरलीधरन यांना हे प्रकरण तातडीचे वाटल्याने त्यांनी पोलीस आयुक्तांना २४ तासांत निर्णय घेण्याचा आदेश दिला. खंडपीठ बदललताच मुख्य न्यायाधीशांनी मेहतांचे म्हणणे मान्य करून सुनावणी १३ एप्रिलपर्यत तहकूब केली.बदलीचा आदेश निघालाउच्च न्यायालयातील अशी फौजदारी याचिका मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठापुढेच येणे अपेक्षित होते. बुधवारी मुख्य न्यायाधीश पटेल नसल्याने याचिका न्या. मुरलीधरन यांच्या खंडपीठापुढे गेली होती. गुरुवारी मुख्य न्यायाधीश रुजू झाल्यावर नियमानुसार त्यांच्यापुढे सुनावणी झाली.न्या. मुरलीधरन यांनी पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयात बदली करण्याची शिफारस कॉलेजियमने १२ फेब्रुवारी रोजीच केली होती. तो आदेश राष्ट्रपतींनी बुधवारी रात्री काढला. त्यांच्यासह इतरही उच्च न्यायालयांतील न्यायाधीशांच्या बदल्या एकाच वेळी केल्या गेल्या.

टॅग्स :delhi violenceदिल्ली