शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Violence : पाकिस्तान्यांनो या, तुम्हाला भारताचं नागरिकत्व देतो म्हणत BSF जवानाचं घर पेटवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 17:00 IST

आंदोलकांनी घराबाहेर असलेल्या गाड्यासुद्धा पेटवून देण्यात आल्या होत्या...

ठळक मुद्दे देशाची राजनाधी असलेल्या दिल्लीमधल्या उत्तर पूर्व भागात मोठ्या प्रमाणात हिंसाचार पसरलेला आहे. 25 फेब्रुवारीच्या दुपारी खजुरी भागातील एका जवानाच्या घरात तोडफोड अन् जाळपोळ करण्यात आली. खजुरी खास भागातील एका घरावर नेमप्लेटमध्ये बीएसएफ जवानाचं नावं होतं. घर नंबर 76 बीएसएफ हे मोहम्मद अनिस यांचं आहे आणि त्यावर बीएसएफच्या प्रतीकाचं चिन्हदेखील आहे.

नवी दिल्लीः देशाची राजनाधी असलेल्या दिल्लीमधल्या उत्तर पूर्व भागात मोठ्या प्रमाणात हिंसाचार पसरलेला आहे. त्यानंतर आता आंदोलकांनी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF)च्या जवानाच्या घरांवर निशाणा साधला आहे. 25 फेब्रुवारीच्या दुपारी खजुरी भागातील एका जवानाच्या घरात तोडफोड अन् जाळपोळ करण्यात आली. खजुरी खास भागातील एका घरावर नेमप्लेटमध्ये बीएसएफ जवानाचं नावं होतं. घर नंबर 76 बीएसएफ हे मोहम्मद अनिस यांचं आहे आणि त्यावर बीएसएफच्या प्रतीकाचं चिन्हदेखील आहे.विशेष म्हणजे घराबाहेर असलेल्या गाड्यासुद्धा पेटवून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर जमावानं त्यांच्या घरावर दगडफेक केली. तसेच हिंसक झालेल्या जमावानं पाकिस्तान्यांनो या, तुम्हाला भारताचं नागरिकत्व देतो, असं म्हणत अनिसच्या घराच्या दिशेनं सिलिंडरही फेकला. अनिस यांनी पॅरामिलिटरी फोर्समधून आपल्या करिअरला 2013मध्ये सुरुवात केली. जवळपास 3 वर्षं जम्मू-काश्मीर सेवा देत होते. अनिसबरोबर 55 वर्षांचे वडील मोहम्मद मुनीस, 59 वर्षीय काका मोहम्मद अहमद आणि 18 वर्षीय चुलत भाऊ घरात होता. त्यानंतर लागलीत ते सगळे घराबाहेर पडले आणि पॅरामिलिटरी फोर्सनं त्यांची मदत केली. कोणताही शेजारी हल्ल्यात सहभागी नाहीअनिसच्या घरात दोन लग्न होणार होती. अनिस स्वतःही पुढच्या महिन्यात लग्न करणार होता. आगीत आयुष्याची जमा-पुंजी, सोन्याचे दागिने आणि चांदीच्या वस्तू जळून खाक झाल्याचं त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे. आम्ही दर महिन्याना पैसे साठवून दागिने खरेदी केले होते. तसेल लग्नासाठी 3 लाख रुपयांपर्यंतची रोख रक्कम जमवली होती. खजुरी खास हा हिंदूबहुल क्षेत्र आहे. विशेष म्हणजे अनिसच्या हिंदू असलेल्या शेजाऱ्यांनाही जमावाला माघारी फिरण्यास सांगितलं होतं. त्यांनीसुद्धा या हिंसेला विरोध केला होता.  

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकdelhi violenceदिल्ली