शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

Delhi Violence : देशातून धर्मनिरपेक्षता, समाजवाद अन् लोकशाही संपुष्टात, मित्रपक्षाकडून भाजपाला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 15:41 IST

पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि लोकशाहीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

ठळक मुद्देपंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि लोकशाहीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.दिल्लीत होत असलेला हिंसाचार ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. शांततेत जगणे खूप महत्त्वाचे आहे. आमच्या देशाच्या संविधानात तीन गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. ज्यात धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि लोकशाहीचा समावेश आहे.

नवी दिल्लीःदिल्लीतल्या हिंसाचारावर भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या अकाली दलानं मोठं विधान केलं आहे. अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि लोकशाहीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. दिल्लीत होत असलेला हिंसाचार ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. शांततेत जगणे खूप महत्त्वाचे आहे. आमच्या देशाच्या संविधानात तीन गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. ज्यात धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि लोकशाहीचा समावेश आहे. इथे धर्मनिरपेक्षता किंवा समाजवाद नाही. श्रीमंत श्रीमंत होत चालला आहे, तर गरीब आणखी गरीब होत गेला आहे. लोकशाहीसुद्धा फक्त दोन स्तरावरच शिल्लक राहिली आहे. एक लोकसभा निवडणूक आणि दुसरी विधानसभा निवडणूक, बाकी काहीही नाही.  

Delhi Violence : ताहिर हुसैनविरोधात गुन्हा दाखल, कधीही होऊ शकते अटक

तत्पूर्वी माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचा मुलगा आणि अकाली दलाचे नेते नरेश गुजराल यांनी पत्र लिहून दिल्ली पोलिसांच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना पत्र लिहिलं. प्रत्येक वेळी अल्पसंख्याकांना हिंसेत लक्ष्य करणं दुर्दैवी आहे. नरेश गुजराल म्हणाले, 1984ची परिस्थिती मला पुन्हा पाहायची नाही. मला दिल्लीकर असण्यावर गर्व आहे. गेल्या वेळी शीख होते अन् यावेळी मुसलमान आहेत. प्रत्येक वेळी अल्पसंख्याक समाजावरच हल्ले चढवले जातात. 1984मध्ये शीखविरोधी दंगली झाल्या होत्या. त्यावेळी हजारो लोकांना जिवानिशी जावं लागलं होतं.  माझ्या तक्रारीनंतरही कारवाई नाही नरेश गुजराल पत्रात लिहितात, मी फोन करून एका घरात फसलेल्या 16 मुस्लिमांबाबत माहिती दिली होती. ऑपरेटरलाही सांगितलं की, मी संसदेचा सदस्य आहे. तेव्हा दिल्ली पोलिसांनी माझ्या तक्रारीचा नंबर 946603 असल्याची माहिती दिली. परंतु माझ्या तक्रारीवर कोणतीही कारवाई न झाल्यानं मी निराश झालो. त्या 16 व्यक्तींची दिल्ली पोलिसांनी कोणतीही मदत केली नाही. Delhi Violence: कोण आहे ताहिर हुसैन?; गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्याची हत्या केल्याचा आरोप 

Delhi Voilence : 'दुसऱ्यांना वाचवण्याच्या नादात माझ्या मुलाने जीव गमावला'

टॅग्स :delhi violenceदिल्लीNarendra Modiनरेंद्र मोदी