शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Delhi violence: घरमालकाने बाहेर काढले; जमावाने केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 02:17 IST

डोक्याला गंभीर इजा; मूळच्या उत्तर प्रदेशातील जखमी आसीफला अश्रू अनावर

नवी दिल्ली : चोहोबाजूने हिंसा सुरू असताना घरमालकाने हाकलून दिल्यामुळे जमावाच्या तावडीत सापडलो आणि दहा-बारा जणांकडून बेदम मारहाण सुरू झाली. हे सांगताना ईशान्य दिल्लीतील २० वर्षीय मोहम्मद आसीफ याला अश्रू अनावर झाले होते. मूळचा उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरचा आसीफ गंभीर जखमी झाला असून, त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे.हिंसाचारामुळे मंगळवारी सकाळीत घरमालकाने आसीफला घराबाहेर काढले. मालकाने घराबाहेर काढताच जमाव माझ्यावर तुटून पडला. घरमालकाने हाकलल्यानंतर लपण्यासाठी माझ्याकडे जागा नव्हती, असे आसीफने सांगितले. त्याच्या डोक्यावर लोखंडी पाइपने वार करण्यात आले असून, त्याच्यावर जीटीबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.आसीफच्या पायाला व हातालाही गंभीर जखमा झाल्या आहेत. आसीफने आपल्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली असून त्याचे कुटुंबीय त्याला गावी घेऊन जाणार आहेत. आसीफ हा शिंप्याच्या दुकानात नोकरीला होता.जखमींवर जीटीबी आणि लोक नायक जय प्रकाश नारायण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जीटीबी रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, विच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांना सोपवण्यात येत आहेत. जखमींपैकी अनेकांना गोळ्या लागल्या आहेत. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका २० वर्षीय युवकाच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याच्या डोक्यात लोखंडी गज घुसला होता. गज काढल्यानंतर रुग्ण शुद्धीवर आल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शनईशान्य दिल्लीतील हिंसाचाराची किंचितशीही धग विजय पार्क व यमुना विहार परिसराला लागली नाही. याठिकाणी अनोखी हिंदू-मुस्लिम एकता असल्याने साऱ्यांनीच बंधुभाव जपला. त्यामुळेच आजही सारे जण गुण्यागोविंदाने तेथे राहत आहेत.विजय पार्क आणि यमुना विहारमधील रहिवाशांनी कुणालाही घुसू दिले नाही. त्यामुळेच रस्त्याच्या एका बाजूला घरांचे नुकसान झाले; पण दुसºया बाजूला नुकसान झाले नाही.येथे विविध धर्मांचे लोक राहतात. येथे मंदिर व मशीद यांच्यातील अंतर अवघे १०० मीटर एवढे आहे. सायंकाळी मशिदीमध्ये नमाज पढला जातो, तर मंदिरात आरती होते. मात्र, त्याचा कुठलाही त्रास झाल्याची तक्रार आजवर कुणी केली नाही.

टॅग्स :delhi violenceदिल्ली