शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या अंत्यसंस्कारासाठीही पैसे नाहीत; कर्ज घेऊन लेकीला दिला अखेरचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 08:43 IST

दिल्लीच्या शाहबाद डेअरी परिसरात साहिल नावाच्या तरुणाने १६ वर्षीय मुलीची चाकूने ४० वार करत आणि दगडाने ठेचून हत्या केली

नवी दिल्ली - देशाच्या राजधानीत पुन्हा एकदा संतापजनक घटना घडली. याठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला करत त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र पीडितेच्या आई वडिलांची आर्थिक स्थिती इतकी खराब आहे की मुलीच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांना कर्ज घ्यावे लागले. मुलीचे अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीला पोहचले असता तेथील कर्मचाऱ्यांनी ३५०० रुपये शुल्क आकारले परंतु तितके पैसे देणेही तिच्या कुटुंबाला शक्य नव्हते. 

आई वडिलांनी हात जोडून कर्मचाऱ्यांना विनंती केली परंतु पैसे घेतल्याशिवाय मुलीवर अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यानंतर आईवडिलांनी मुलीच्या अंत्यसंस्कारासाठी आसपासच्या लोकांकडे मदतीची याचना केली. बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांकडूनही पैसे घेतले आणि कर्मचाऱ्यांना ३ हजार रुपये दिले. पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, हे ३००० आम्ही शेजारील लोक आणि नातेवाईकांकडून कर्ज म्हणून घेतले. कुटुंबात १२ वर्षाचा मुलगा आहे जो सध्या शिक्षण घेतोय. मुलीच्या हत्येनंतर कुटुंब उद्ध्वस्त झालं असा टाहो कुटुंबियांनी फोडला. 

याच महिन्यात मुलीने १० वी पास केली होती. शिक्षणात साक्षी हुशार होती. तिला वकील बनण्याची इच्छा होती. तिला शिक्षणासाठी जे हवे ते देण्याचं मी ठरवले होते. माझी मुलगी आता या जगात नाही यावर माझा विश्वास बसत नाही. मुलीच्या मृतदेहाला अग्नी देताना बापाच्या डोळ्यात पाणी आले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली. माझी मुलगी कुणाच्यामध्ये नव्हती. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा ती शेजारील महिलेच्या घरी गेली होती. त्या मुलासोबत माझ्या मुलीची मैत्री होती असं वाटत नाही. जर तो मित्र असता तर इतक्या क्रूरपणे तिची हत्या केली नसती असं साक्षीच्या वडिलांनी सांगितले. 

काय आहे प्रकरण?दिल्लीच्या शाहबाद डेअरी परिसरात साहिल नावाच्या तरुणाने १६ वर्षीय मुलीची चाकूने ४० वार करत आणि दगडाने ठेचून हत्या केली. या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली. याबाबत एडीसीपी आऊटर-उत्तर राजा बंठिया यांनी सांगितले की, मुलगी जे.जे. जे. कॉलनीची रहिवासी आहे. ती रस्त्यावरुन चालत जात असताना आरोपीने तिला अडवले आणि तिच्यावर चाकूने हल्ला केला. आरोपी मुलगा आणि मुलगी आधीपासून एकमेकांना ओळखत होते. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता, त्याला बुलंदशहर येथून अटक करण्यात आली आहे.