शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली दंगल प्रकरण : जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिदला कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 00:51 IST

उमर खालिद याने चौकशीसाठी रविवारी हजर व्हावे, असा आदेश दिल्ली पोलिसांनी त्याला शनिवारी दिला होता. त्यानुसार तो हजर होताच बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्यान्वये (यूपीएए) त्याला अटक करण्यात आली.

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता उमर खालिद याला दिल्ली न्यायालयाने सोमवारी १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. खालिद याला दहशतवादविरोधी कायदा व बेकायदा कारवाया (प्रतिबंधक) कायद्याखाली रविवारी अटक रात्री झाली. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ईशान्य दिल्लीत झालेल्या जातीय दंगलीसंबंधी त्याला अटक झाली आहे. उमर खालिद याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमिताभ रावत यांच्या समोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते.उमर खालिद याने चौकशीसाठी रविवारी हजर व्हावे, असा आदेश दिल्ली पोलिसांनी त्याला शनिवारी दिला होता. त्यानुसार तो हजर होताच बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्यान्वये (यूपीएए) त्याला अटक करण्यात आली. याआधी ३१ जुलै रोजी उमर खालिद याची दिल्ली पोलिसांनी चौकशी केली होती. उमर खालिदवर येत्या काही दिवसांत दिल्ली पोलीस आरोपपत्र दाखल करतील. दिल्ली क्राइम ब्रँचच्या अमली पदार्थविरोधी शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अरविंदकुमार यांना एका खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे उमर खालिदविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, खबºयाने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत फेब्रुवारी महिन्यात झालेली जातीय दंगल हा पूर्वनियोजित कट असून तो आखण्यात उमर खालिद, दानिश व अन्य संघटनांचे दोन सदस्य यांचा सहभाग होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताच्या दौºयावर असतानाच्या दिवसांत लोकांनी रस्त्यावर उतरून वाहतूक बंद पाडावी व आंदोलन सुरू करावे, असे आवाहन खालिद याने केले होते.दिल्लीमध्ये दोन ठिकाणी केलेल्या चिथावणीखोर भाषणांमध्ये केले होते, असे या एफआयआरमध्ये म्हटले आहे.दंगलीसाठी केली पूर्वतयारीजातीय दंगल घडवायची असल्याने दिल्लीतील जाफराबाद, चांद बाग, गोकुळपुरी, शिवविहार व आजूबाजूच्या भागांमधील घरांमध्ये पेट्रोल बॉम्ब, अ‍ॅसिडने भरलेल्या बाटल्या, दगड, शस्त्रे आदींचा मोठा साठा करून ठेवण्यात आला होता.विविध भागांतील लोकांनी रस्त्यावर उतरून हिंसाचार घडवावा याची जबाबदारी दानिश याच्यावर सोपविण्यात आली होती. महिला व मुलांनी जाफराबाद मेट्रो स्टेशनजवळचे सर्व रस्ते २३ फेब्रुवारी रोजी रोखले होते. तोही पूर्वनियोजित कटाचाच भाग होता, असे उमर खालिदविरोधात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :delhi violenceदिल्ली