शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत प्रदूषणाचा कहर, शाळांना सुट्टीजाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 05:03 IST

दिल्लीतील प्रदूषण मंगळवारी अतिशय गंभीर स्तरावर पोहोचले असून, धुक्याच्या गडद चादरीमुळे आज दिल्लीत हवेची गुणवत्ता आणि दृश्यमानता यात मोठी घसरण झाली आहे.

नवी दिल्ली : दिल्लीतील प्रदूषण मंगळवारी अतिशय गंभीर स्तरावर पोहोचले असून, धुक्याच्या गडद चादरीमुळे आज दिल्लीत हवेची गुणवत्ता आणि दृश्यमानता यात मोठी घसरण झाली आहे. हवेची गुणवत्ता चिंताजनक झाल्याने, दिल्लीत सार्वजनिक ठिकाणी फिरणेही अवघड झाले आहे.केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने हवेच्या गुणवत्तेला अतिशय गंभीर असल्याचे म्हटले आहे. याचा अर्थ प्रदूषण अतिशय गंभीर स्तरावर पोहोचले आहे. मंगळवारी सकाळी प्रदूषण बोर्डाने हवेची गुणवत्ता तपासली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार यासाठी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणाकडून उपाययोजना केल्या जाऊ शकतात.यात पार्किंग शुल्क चारपट वाढविले जाऊ शकते. हीच स्थिती आगामी ४८ तास कायम राहिल्यास ग्रेडेड रिस्पॉन्स अ‍ॅक्शन प्लाननुसार (जीआरएपी) शाळा काही कालावधीसाठी बंद ठेवल्या जाणार आहेत, तसेच सम-विषम वाहन योजना पुन्हा सुरू होणार आहे. या आधी २० आॅक्टोबर रोजीही दिल्लीतील हवेची गुणवत्ता चिंताजनक होती.अशा हवेमुळे लोकांना श्वासासंबंधी त्रास होऊ शकतो. श्वास आणि हृदय व रक्तवाहिन्यांचा त्रास असलेल्या नागरिकांवर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे एयर लॅब प्रमुख दीपांकर साहा यांनी सांगितले की, हवा अजिबात वाहात नसून, त्यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. शेजारील पंजाब आणि हरयाणा राज्यांत या काळात शेतीमधील काडीकचरा जाळण्यात येत आहे. त्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे, तसेच नोएडा व गाझियाबादमध्येही हवा अतिशय वाईट आहे.वाढते प्रदूषण पाहता, दिल्लीतील शाळा काही दिवस बंद ठेवाव्यात, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांना सांगितले. सिसोदिया यांच्याकडे शिक्षण खाते आहे. त्यांचे खाते या संबंधात आदेश काढला आहे. मात्र, आजही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती अतिशय कमी होती. इंडियन मेडिकल असोसिएशननेही शाळांमध्ये खुल्या मैदानात होणारे खेळ आणि इतर अ‍ॅक्टिव्हिटी थांबवाव्यात, असे आवाहन सरकारला केले आहे. तसे केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे रक्षण होऊ शकेल. दिल्लीतील हाफ मॅरेथॉनही रद्द करण्याची मागणीही मेडिकल असोसिऐशनने केली आहे.जवानांना दिले ९००० मास्ककेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जवानांना ९००० मास्कचे वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. आयएसएफचे हे जवान विमानतळ, दिल्ली मेट्रो आणि अन्य सरकारी मंत्रालयात तैनात आहेत. खुल्या जागेत ड्युटी करत असलेल्या जवानांना विषारी वायूपासून बचाव करता यावा, म्हणून हे मास्क देण्यात आले आहेत. पोलिसांनाही असे मास्क दरवर्षी देण्यात येतात.