शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Delhi Lockdown Extended : दिल्लीत कोरोनाची स्थिती गंभीर, लॉकडाऊनचा कालावधी वाढविला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 13:40 IST

Delhi Lockdown Extended : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुढील एक आठवड्यासाठी लॉकडाऊन वाढविला आहे.

ठळक मुद्देदिल्लीत कोरोनाचा संसर्ग आता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सतत वाढत्या कोरोना संसर्गामुळे गेल्या २४ तासांच ३५७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) झपाट्याने वाढत आहे. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने (Delhi Government) दिल्लीतील लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता दिल्लीत एक आठवड्यापुरता लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र, कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ होत असल्यामुळे आता लॉकडाऊन एक आठवड्यासाठी म्हणजेच ३ मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. (We had imposed a 6-day lockdown in Delhi. The lockdown is being extended to next Monday till 5 am: Delhi CM Arvind Kejriwal)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक आठवड्यासाठी लॉकडाऊन वाढविला आहे. यावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले, दिल्लीत रुग्णांच्या संख्येत वाढ होता आहे. यामुळे दिल्लीतील लॉकडाऊन (Delhi Lockdown Extended) पुढील सोमवारी सकाळी ५ वाजेपर्यंत वाढविण्यात आला आहे. अजूनही कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन हे शेवटचे शस्त्र आहे.

ऑक्सिजनची कमतरता - अरविंद केजरीवालसध्याच्या परिस्थितीत दिल्लीत ऑक्सिजनची गरज ७०० टनची आहे. मात्र केंद्र सरकारकडून आम्हाला ४८० टन ऑक्सिजन देण्यात आले आहे. काल १० टन ऑक्सिजन केंद्र सरकारने दिले आहे, म्हणजे एकूण ४९० टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र, ऑक्सिजनचा पूर्णपणे पुरवठा केला जात नाही. दिल्लीला ३३० ते ३३५ टन ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे, त्यामुळे दिल्लीत ऑक्सिजनची कमतरता जास्त आहे, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. 

(Fact Check: ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध नसल्यास नेब्युलायझरचा वापर होऊ शकतो? जाणून घ्या सत्य...)

राजधानी दिल्लीत गेल्या २४ तासांत ३५७ जणांचा मृत्यूदिल्लीत कोरोनाचा संसर्ग आता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सतत वाढत्या कोरोना संसर्गामुळे गेल्या २४ तासांच ३५७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २४१०३ नवे रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, आतापर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या ९३०८० वर पोहोचली आहे. गेल्या शुक्रवारी ३४८ लोकांचा मृत्यू झाला होता. तर २४३३१ नवीन रुग्णांचा कोरोनाची लागण झाली होती. गुरुवारी दिल्लीत कोरोना संसर्गाची २६१६९ नवीन प्रकरणे नोंदविली गेली. याशिवाय, ३०६ संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला होता. दिल्लीत गेल्या १० दिवसांत कोरोनामुळे १७५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

(CoronaVirus Live Updates : कोरोनाचा विस्फोट! गेल्या २४ तासांत ३,४९,६९१ नवे रुग्ण, २७६७ जणांचा मृत्यू )

टॅग्स :delhiदिल्लीcorona virusकोरोना वायरस बातम्याArvind Kejriwalअरविंद केजरीवालNew Delhiनवी दिल्ली