शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
3
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
4
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
5
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
6
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
7
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
8
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
9
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
10
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
11
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
12
"शाहरुख खानसोबत काम करताना तो...", निवेदिता सराफ यांनी सांगितला अनुभव; जॅकी श्रॉफ तर...
13
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
14
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
15
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
16
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
17
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
18
दिवाळीआधीच धमाका! विवोचा मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
19
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
20
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

तात्काळ 'तो' व्हिडीओ हटवा; सुनीता केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश, उत्तरही मागितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 20:45 IST

दिल्ली उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांना नोटीस बजावली आहे.

Sunita Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यानंतर आता त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्यादेखील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दिल्लीउच्च न्यायालयाने शनिवारी एका याचिकेवर सुनावणी करताना सुनीता केजरीवाल, फेसबुक, यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह सर्व पक्षकारांना नोटीस बजावली. अरविंद केजरीवालउच्च न्यायालयात हजर असताना कनिष्ठ न्यायालयात खटल्याच्या सुनावणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याबद्दल त्यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. दिल्ली उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांना हा व्हिडिओ काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. हा व्हिडिओ कोर्टातील सुनावणीचा आहे. या व्हिडिओमध्ये अरविंद केजरीवाल कोर्टात न्यायाधीशांसमोर आपला युक्तिवाद करत आहेत. हा व्हिडिओ त्यावेळचा आहे जेव्हा केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. यानंतर, २८ मार्च रोजी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात आपली बाजू मांडली. या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने सुनीता केजरीवाल यांच्यासह सर्व पक्षकारांना नोटीस बजावली आहे.

उच्च न्यायालयाने सुनीता यांच्यासह सर्व पक्षकारांना त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून व्हिडिओ हटवण्यास सांगितले आहे. ज्या लोकांनी हे व्हिडीओ पुन्हा पोस्ट केले आहेत त्यांना हटवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सोशल मीडिया कंपन्यांना दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ जुलै रोजी होणार आहे. न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा आणि अमित शर्मा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. त्यामुळे आता हा व्हिडीओ न हटवल्यास सुनीता केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सुनीता केजरीवाल आणि इतरांनी २८ मार्च २०२४ रोजी ट्रायल कोर्टात दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या हजेरीदरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंग नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे ट्रायल कोर्टाची कार्यवाही रेकॉर्ड केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. वकील वैभव सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेत आरोप केला आहे की सुनीता केजरीवाल आणि इतरांनी न्यायालयीन कार्यवाही केवळ अनधिकृत पद्धतीने रेकॉर्ड केली नाही तर ती सोशल मीडियावरही शेअर केली. त्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाने सुनीता केजरीवाल यांच्यासह इतरांना नोटीस पाठवून व्हिडीओ हटवण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, २१ मार्च रोजी अरविंद केजरीवाल यांना तपास यंत्रणेने पाठवलेल्या नऊ समन्सकडे दुर्लक्ष केल्यामुळे अबकारी धोरण घोटाळ्याच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली. नंतर दिल्ली उच्च न्यायालयाने ईडीच्या कारवाईवर शिक्कामोर्तब केले. निवडणूक काळात अरविंद केजरीवाल हे तुरुंगाबाहेर आले होते. मात्र मुदत संपल्यानंतर त्यांनी पुन्हा आत्मसमर्पण केलं.   

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीHigh Courtउच्च न्यायालयAAPआप