शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

परदेशात जायचंय? 18 हजार कोटी जमा करा, कोर्टाचे गोयल यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 17:19 IST

दिल्ली उच्च न्यायालयानं जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना परदेशात जाण्याची परवानगी अप्रत्यक्षरीत्या फेटाळली आहे.

नवी दिल्लीः दिल्ली उच्च न्यायालयानं जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना परदेशात जाण्याची परवानगी अप्रत्यक्षरीत्या फेटाळली आहे. तसेच त्यांच्याविरोधातल्या ‘लूक आउट सर्क्युलर’ (एलओसी)ला आव्हान देणाऱ्या याचिकेवरून केंद्र सरकारकडून न्यायालयानं उत्तरही मागितलं आहे. न्यायाधीश सुरेश कैत म्हणाले, यावेळी गोयल यांना कोणताही अंतरिम दिलासा देता येणार नाही. जर त्यांना तात्काळ परदेश दौरा करायचा असेल तर त्यांना हमीच्या आधारे 18 हजार कोटी रुपये जमा करावे लागतील.गोयल यांनी लूक आऊट सर्क्युलरला आव्हान देणाऱ्या याचिकेत म्हटलं आहे की, माझ्याविरोधात प्राथमिक स्वरूपात कोणताही गुन्हा दाखल नाही. तरीही 25 मे रोजी मला दुबईला जाणाऱ्या विमानातून उतरण्यात आले. जेव्हा मी 25 मे रोजी पत्नीबरोबर दुबईला जात होतो, तेव्हा म्हणजेच 25 मे रोजी लूक आऊट सर्क्युलरबद्दल समजलं. गोयल पत्नीसह पहिल्यांदा दुबईला जाणार होते आणि तिकडून ते लंडनसाठी रवाना होणार होते. न्यायालयानं गोयल यांना परदेशात जाण्याचं कारणही विचारलं आहे. तुम्ही गुंतवणूकदारांशी फोनवरून बोलू शकत नाही काय?, परदेशात जाण्याचा अधिकार हा मर्यादित आहे. तुम्हीही काहीही कराल आणि मग परदेशात जाल, तर असं होत नाही, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. अनेक प्रकरणात अडकलेली अशी बरीच माणसं परदेशात गेली आहेत आणि त्यांना परत भारतात बोलवण्यासाठी सरकारला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत आहेत. गोयल यांनी परदेशात जाण्याचा हेतू न्यायालयाकडे स्पष्ट केलेला नाही.गेल्या काही काळापासून आर्थिक संकटात सापडलेली विमान वाहतूक कंपनी जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. नरेश गोयल यांच्यासोबत त्यांची पत्नी अनिता गोयल यांनीही जेट एअरवेजमधील आपले पद सोडले होते. नरेश गोयल हे जेट एअरवेजच्या मुख्य प्रवर्तकांपैकीएक होते. दरम्यान, कंपनीची आर्थिक बाजू कोलमडू लागल्यानंतर स्वत:हून नरेश गोयल यांनी स्वत:हून पुढाकार घेत राजीनामा देण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यादरम्यान त्यांनी जेटच्या कर्मचाऱ्यांना एक भावूक पत्र लिहून आपण कुठलेही बलिदान देण्यास तयार आहोत, असे म्हटले होते. 

टॅग्स :Jet Airwaysजेट एअरवेज