शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली: हनुमान जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान हिंसाचार; अनेक वाहनांची तोडफोड, पोलीसही जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 21:15 IST

हनुमान जयंतीच्या दिनी निघालेल्या मिरवणुकीदरम्यान काही समाजकंटकांनी गाड्यांची तोडफोड केली. यात काही पोलीस कर्मचारी जखमीही झाले.

हनुमान जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीदरम्यान दिल्लीच्या जहांगीर पुरीमध्ये हिंसाचार झाल्याची घटना घडली. काही समाजकंटकांनी वाहनांची तोडफोड केली असून यात पोलीस कर्मचारीही जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हनुमान जयंतीनिमित्त मिरवणूक काढली जात असताना हा हिंसाचार सुरू झाला आणि बघता बघता काही समाजकंटकांनी अनेक वाहनांची तोडफोड केली. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांवरही हल्ला करण्यात आला.

या घटनेनंतर याचा व्हिडीओदेखील समोर आला. पोलिसांनी जेव्हा परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही समाजकंटकांनी त्यांच्यावरही हल्ला केला. तसंच मिरवणुकीवरही दगडफेक केल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेत जखमी झालेल्यांना जहांगीरपुरीतील बाबू जगजीवनराम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. मिरवणुकीदरम्यान ही घटना घडल्याची माहिती दिल्ली पोलिस पीआरओचे काम पाहणारे डीसीपी अनवेयस राय यांनी सांगितलं.

सध्या या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात असून अतिरिक्त पोलीस दलही तैनात करण्यात आलं आहे. काही ठिकाणी आगीच्याही घटना घडल्या असून आग ही मोठ्या प्रमाणात नव्हतं त्यामुळे ऑपरेशन कॉल ऑफ करण्यात आलं आणि गाड्याही माघारी बोलावण्यात आल्याचं दिल्ली फायर सर्व्हिसेसचे डायरेक्टर अतुल गर्ग यांनी सांगितलं.  शांतता राखण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहनयावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली. "सर्वांनी शांतता राखावी. दिल्लीच्या जहांगीरपुरीतील मिरवणुकीवरील दगडफेकीची घटने नींदनीय आहे. दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे. लोकांनी एकमेकांसोबत राहून शांतता कायम ठेवली पाहिजे," असं केजरीवाल म्हणाले.

टॅग्स :delhi violenceदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल