शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

३ कोटी लोकसंख्या, सिंगापुरसारखं इन्कम...पाहा काय आहे केजरीवाल यांचा 'फ्युचर प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 16:21 IST

केजरीवाल सरकारनं केली शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रावर मोठी तरतूद

ठळक मुद्देकेजरीवाल सरकारनं केली शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रावर मोठी तरतूददिल्लीचे अर्थमंत्री मनिष सिसोदिया यांनी सादर केला अर्थसंकल्प

दिल्लीतील केजरीवाल सरकारनं मंगळवारी आपला अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये दिल्ली सरकारनं २०४७ पर्यंत दिल्लीतील नागरिकांचं प्रति व्यक्ती उत्पन्न हे सिंगापुरच्या नागरिकांच्या उत्पन्नाइतकं करण्याचं ध्येय ठरवलं आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री मनिष सिसोदिया यांनी मंगळवारी दिल्लीचा अर्थसंकल्प सादर केला.२०४७ पर्यंत दिल्लीची लोकसंख्या ३ कोटी पर्यंत जाण्याची शक्यता असल्याचं सिसोदिया यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी जवळपास ६९ हजार कोटी रूपयांचा अर्थसंकल्प सादर केला. दिल्लीवरील कर्जाची रक्कम कमी होऊन ती राज्याच्या जीडीपीच्या ३.७४ टक्के इतकी झाली आहे. दिल्ली सरकारचा अर्थसंकल्प सरप्लस असतो आणि हा सीएजीनीदेखील स्वीकार केला असल्याचं त्यांनी नमूद केलं. जवळपास ६९ हजार कोटी रूपयांच्या या अर्थसंकल्पात दिल्ली सरकारनं शिक्षण क्षेत्रासाठी १६,३७७ कोटी रूपये, आरोग्य सेवांसाठी ९,९३४ कोटी रूपये, पायाभूत सुविधांसाठी ९,३९४ कोटी आणि झोपडपट्टीवासीयांच्या घरांसाठी ५,३२८ कोटी रूपयांची तरतूद केली आहे. याशिवायन अनधिकृत कॉलनींसाठीही १,५५० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. २०४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून १०० वर्षे पूर्ण होतील, याकडे पाहता दिल्ली सरकारनं काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. तसंच या अर्थसंकल्पाची थीमही देशभक्ती ठेवण्यात आली आहे. या अंतर्गत स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांचाही आनंद साजरा केला जाणार आहे."२०४७ मध्ये दिल्ली कुठे असेल याचा मी पाया रचू इच्छित आहे. आम्ही केजरीवाल मॉडेल गव्हर्नंन्स सादर करत आहोत. २०४७ मद्ये दिल्ली शिक्षित आणि समर्थ बनेल," असा विश्वास सिसोदिया यांनी व्यक्त केला. स्वातंत्र्यापूर्वी दिल्लीची लोकसंख्या ४ लाख होती. १९४७ मध्ये यात वाढ झाली. २०४७ पर्यंत ही लोकसंख्या तीन कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. २०४७ पर्यंत केजरीवाल सरकारनं दिल्लीचं प्रति व्यक्ती उत्पन्न हे सिंगापुरमधील व्यक्तीच्या उत्पन्नाप्रमाणे करण्याचं ध्येय ठेवलं असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

कोरोनासाठी ५० कोटीदिल्ली  सरकार दिल्लीतील सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांचे मोफत उपचार करणार आहे आणि यासाठी ५० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती सिसोदिया यांनी दिली. याव्यतिरिक्त त्यांनी प्रत्येक व्यक्तीला आरोग्य कार्ड, महिलांसाठी विशेष रुग्णालये, सैनिक शाळा, देशातील पहिलं शिक्षक विद्यापीठ आणि ऑलिंपिक सामन्यांचं नेतृत्व करण्याचं ध्येय ठेवल्याचंही म्हटलं.

टॅग्स :delhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालEducation Sectorशिक्षण क्षेत्रHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल