शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
5
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
6
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
7
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
8
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
9
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
10
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
11
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
12
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
13
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
14
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
15
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
16
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
17
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
18
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
19
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
20
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...

कोणत्या निवडणुकीत पहिल्यांदा एक्झिट पोलचा वापर झाला? काय आले होते निकाल? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 21:39 IST

Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एक्झिट पोलची चर्चा सुरू झाली आहे.

Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुका संपल्यापासून एक्झिट पोलची चर्चा सुरू झाली आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पक्ष दिल्लीत सरकार स्थापन करणार असल्याचे बोलले जात आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, एक्झिट पोल म्हणजे काय? याची सुरुवात कधी आणि कुठे झाले? आज आम्ही तुम्हाला याच एक्झिट पोलबद्दल सांगणार आहोत. 

एक्झिट पोल म्हणजे काय? तर, एक्झिट पोल हे एक सर्वेक्षण आहे, जे मतदानाच्या दिवशी जाहीर केले जाते. या सर्वेक्षणादरम्यान मतदानासाठी बाहेर पडणाऱ्या मतदारांना विचारले जाते की, त्यांनी कोणाला मतदान केले आहे. अशा प्रकारे, कंपन्या डेटाचे विश्लेषण करून कोणाचे सरकार बनवले जात आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. याला एक्झिट पोल म्हणतात.

एक्झिट पोल या देशात पहिल्यांदा सुरू झाला?आज भारताशिवाय असे अनेक देशात निवडणुकीपूर्वी आणि नंतर एक्झिट पोल दाखवले जातात. पण तुम्हाला माहित आहे का, एक्झिट पोल कोणत्या देशात सर्वात आधी दाखवला गेला? 1936 मध्ये अमेरिकेत पहिला एक्झिट पोल घेण्यात आला होता. त्यावेळी जॉर्ज गॅलप आणि क्लॉड रॉबिन्सन यांनी न्यूयॉर्कमध्ये सर्वेक्षण केले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यावेळी मतदान केंद्रांमधून बाहेर पडणाऱ्या मतदारांना विचारण्यात आले की, त्यांनी अध्यक्षपदासाठी कोणत्या उमेदवाराला मतदान केले आहे. त्या एक्झिट पोलमध्ये फ्रँकलिन डी. रुझवेल्ट विजयी होतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता, जो निवडणूक निकालात खरा ठरला. यानंतर, एक्झिट पोलचा ट्रेंड जगभरात वेगाने पसरला. माहितीनुसार, यानंतर ब्रिटनमध्ये 1937 मध्ये आणि फ्रान्समध्ये 1938 मध्ये पहिले एक्झिट पोल घेण्यात आले.

भारतातील पहिला एक्झिट पोल कधी घेतला?भारतात पहिला एक्झिट पोल कधी आला? 1957 मध्ये दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतात पहिल्यांदाच एक्झिट पोल घेण्यात आला होता. त्यावेळी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियनने हे सर्वेक्षण केले होते. पण, त्याला पूर्णपणे एक्झिट पोल म्हटले गेले नाही. यानंतर 1980 मध्ये डॉ. प्रणय रॉय यांनी पहिला एक्झिट पोल काढला. 1996 च्या लोकसभा निवडणुकीत एक्झिट पोलची बरीच चर्चा झाली होती. कारण त्यावेळी दूरदर्शनवर एक्झिट पोल दाखवण्यात आले होते.

सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीजने हे सर्वेक्षण केले आहे. त्या निवडणुकीत एक्झिट पोलने मताधिक्य तुटण्याची शक्यता वर्तवली होती. पुढेही असाच प्रकार घडला. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता, पण बहुमतापासून दूर होता. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले, पण बहुमत नसल्यामुळे त्यांना 13 दिवसांत राजीनामा द्यावा लागला. 

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकexit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीElectionनिवडणूक 2024