शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

"महिलांना दरमहा २१०० रुपये...", दिल्ली निवडणुकीसाठी 'आप'चा जाहीरनामा, १५ आश्वासनांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 13:15 IST

delhi election 2025 : आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पक्षाचा जाहीरनामा  प्रसिद्ध केला आणि त्यात समाविष्ट असलेल्या १५ आश्वासनांची घोषणा केली.

AAP Manifesto : नवी दिल्ली : सध्या दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. दिल्लीतील सत्ताधारी आपसह काँग्रेस आणि भाजपच्या प्रचारसभा जोरदार सुरु आहेत. तसेच, नेते मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येत आहे. अशातच आज आपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. 

आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पक्षाचा जाहीरनामा  प्रसिद्ध केला आणि त्यात समाविष्ट असलेल्या १५ आश्वासनांची घोषणा केली. यावेळी, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्यासह आपचे खासदार संजय सिंह, दिल्ली कॅबिनेट मंत्री सौरभ भारद्वाज आणि गोपाल राय देखील व्यासपीठावर उपस्थित होते.

आपल्या जाहीरनाम्यातील १५ आश्वासने...

१) रोजगार हमी:आम्हाला दिल्लीत एकही व्यक्ती बेरोजगार राहू नये, सर्वांना रोजगार मिळावा अशी इच्छा आहे. दिल्लीतील प्रत्येक मुलाला रोजगार कसा मिळेल, याची आम्ही योजना आखत आहोत.

२) महिला सन्मान योजना :महिला सन्मान योजना लागू केली जाईल.  या योजनेद्वारे प्रत्येक महिलेला तिच्या बँक खात्यात दरमहा २१०० रुपये दिले जातील. सरकार स्थापन होताच हा पहिला निर्णय घेतला जाणार आहे.

३) संजीवनी योजना :या योजनेअंतर्गत आप सरकार ६० वर्षांवरील वृद्धांच्या उपचारांची व्यवस्था करणार आहे. उपचारांचा सर्व खर्च दिल्ली सरकारद्वारे केला जाईल.

४) पाणी बिल :अरविंद केजरीवाल म्हणाले की, जेव्हा मी तुरुंगात गेलो होते, तेव्हा मला कळले की अनेक लोकांना हजारो रुपयांचे पाण्याचे बिल पाठवले गेले आहे. ज्यांना चुकीचे बिल मिळाले आहे, त्यांनी बिल भरू नये. सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही बिले माफ करू.

५) २४ तास पाणी :प्रत्येक घरात २४ तास पाणी आणि स्वच्छ पाण्याची सुविधा केली जाईल. दरम्यान, गेल्या निवडणुकीतही हे आश्वासन देण्यात आले होते, मात्र, गेल्या पाच वर्षांत हे काम करू शकलो, असे यावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले. आधी कोरोना आला आणि नंतर माझी तुरुंगवारी झाली. त्यामुळे माझी संपूर्ण टीम बिखरली. त्यामुळे हे काम होऊ शकले नाही. मात्र, आता ते पूर्ण करू.

६. स्वच्छ यमुना :यमुना नदी स्वच्छ करण्यात येईल. दरम्यान, हे सुद्धा आश्वासन आपने गेल्या निवडणुकीत दिले होते.

७. रस्ते :आम्ही दिल्लीचे रस्ते युरोपियन दर्जाचे बनवू असे म्हटले होते. गेल्या निवडणुकीतही हे आश्वास दिले होते, पण गेल्या पाच वर्षांत ते काम करू शकले नाही. पण यावेळी सर्व रस्ते चांगले केले जातील, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

८) डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती योजना:दलित समाजातील कोणत्याही मुलाने कोणत्याही परदेशी विद्यापीठात प्रवेश घेतला, तर त्याचा सर्व खर्च दिल्ली सरकार करणार आहे. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे.

९) विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवासविद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास दिला जाईल. दिल्ली मेट्रोमध्ये भाड्यात ५० टक्के सूट दिली जाईल.

१०) पुजारी आणि ग्रंथी योजना :पुजारी आणि ग्रंथी योजना लागू करण्यात येईल. अरविंदे केजरीवाल म्हणाले, गुरुद्वारा आणि मंदिरांमध्ये आमच्यासाठी पूजा करतात. त्यापैकी बरेच जण गरीब आहेत. त्यांना या योजनेद्वारे दरमहा पैसे दिले जातील.

११) भाडेकरूंना सुद्धा मिळेल लाभ :भाडेकरूंना वीज बिल आणि पाणी बिलाचाही लाभ मिळेल.

१२) गटार दुरुस्ती :आपचे सरकार स्थापन झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत अनेक गटारांची दुरुस्ती केली जाईल. दिल्लीतील जुन्या सांडपाण्याच्या वाहिन्या दीड वर्षात बदलल्या जातील.

१३) रेशनकार्ड :गरिबांना लाभ मिळावा, यासाठी रेशनकार्ड जारी केली जातील.

१४) मुलींच्या लग्नासाठी १ लाख रुपयांची मदत : ऑटो, टॅक्सी आणि ई-रिक्षा चालकांच्या मुलींच्या लग्नासाठी दिल्ली सरकार १ लाख रुपयांची मदत देणार आहे. तर मुलांना मोफत प्रशिक्षण देईल. तसेच, १० लाख रुपयांचा जीवन विमा आणि ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जाईल, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

१५) कायदा आणि सुव्यवस्था :दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती वाईट आहे. लोक भीतीच्या छायेत जगत आहेत. सर्व आरडब्ल्यूएसाठी खाजगी सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याचेही आश्वासन आपच्या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपAam Admi partyआम आदमी पार्टीAtishiआतिशी