शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

मनीष सिसोदिया म्हणाले, "अरविंद केजरीवाल नरेंद्र मोदींचे पर्याय; भाजपला असुरक्षित वाटतंय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 20:11 IST

PM Narendra Modi : संपूर्ण देशात कोणीही पंतप्रधान मोदी किंवा त्याच्या भाजप मॉडेलची चर्चा करत नाहीत. हे केजरीवाल मॉडेलनं घाबरत आहेत, सिसोदिया यांचा निशाणा

ठळक मुद्देविधेयक पारित होणं हा लोकशाहीसाठी काळा दिवस, आपची टीकादोन्ही सभागृहात विधेयक पारित

दिल्लीमधील लोकनियुक्त सरकार आणि नायब राज्यपाल यांचं अधिकार क्षेत्र निश्चित करणारं विधेयक राज्यसभेत मंजूर झालं. विधेयक राज्यसभेच्या पटलावर येताच विरोधकांनी गोंधळ घातला होता. त्यामुळे कामकाज दोनदा स्थगित करण्यात आलं. हुकूमशाही बंद करा, अशा घोषणा देत विरोधकांनी सभागृह दणाणून सोडलं. याच गोंधळात राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र शासन (सुधारणा) विधेयक म्हणजेच Government of National Capital Territory of Delhi (Amendment) Bill 2021 (GNCTD Bill) राज्यसभेत बुधवारी मंजूर झालं. दरम्यान, या विधेयकाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यापूर्वीही विरोध केला होता. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनीदेखील केंद्र सरकारवर निशाणा साधला. हे विधेयक पारित झाल्यावरून हे लक्षात येतं की भाजप सरकारला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापासून स्वत:ला असुरक्षित वाटत आहे, असं सिसोदिया म्हणाले. तसंच यावेळी त्यांनी केजरीवाल हे नरेंद्र मोदी यांचे पर्याय असल्याचाही उल्लेख त्यांनी केला. "दिल्लीबाबत केंद्र सरकारनं जे विधेयक बुधवारी पारित केलं त्यावरून मोदी सरकारच्या मनात अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या कामामुळे कसं असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालंय हे दाखवून देत आहे. आज देशातील लोकं अरविंद केजरीवाल हे नरेंद्र मोदी यांचा पर्याय असू शकतात अशा चर्चा करू लागले आहेत," असंही ते म्हणाले. काम रोखण्यासाठी विधेयक आणलं"अरविंद केजरीवाल करत असलेल्या कामांना पुढे नेण्यापासून रोखण्यासाठी हे विधेयक आणण्यात आलं आहे. संपूर्ण देशात कोणीही पंतप्रधान मोदी किंवा त्याच्या भाजप मॉडेलची चर्चा करत नाहीत. हे केजरीवाल मॉडेलनं घाबरत आहेत. चांगल्या कामांना रोखण्यासाठी आता नरेंद्र मोदी हे नकारात्मक राजकारण खेळत आहेत," असा आरोप सिसोदिया यांनी यावेळी केला.दोन्ही सभागृहात विधेयक पारितराष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र शासन (सुधारणा) विधेयक सोमवारी लोकसभेत संमत झालं. आता हे विधेयक राज्यसभेत पारित झाल्यानं ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे स्वाक्षरीसाठी जाईल. मागील दारातून दिल्लीतलं सरकार चालवण्याच्या हेतूनंच हे विधेयक मोदी सरकारनं आणल्याचा आरोप विरोधकांनी केला. लोकनियुक्त सरकारच्या अधिकारांवर घाला घालण्यासाठी विधेयक मंजूर करण्यात आल्याचा थेट आरोप दिल्लीत सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्षानं केला होता. काँग्रेसच्या खासदारांनी विधेयकाला विरोध करत राज्यसभेतून सभात्याग केला. त्याच गदारोळात सरकारनं विधेयक पारित करून घेतलं.लोकशाहीसाठी काळा दिवस, आपची टीकाहा दिवस लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याची घणाघाती टीका आपकडून करण्यात आली. मुख्यमंत्री आणि आपचे मुख्य संयोजक अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी हा दिवस लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचं म्हणत मोदी सरकारचा निषेध केला.   

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्लीParliamentसंसदlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभा