शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा पुन्हा महिलेच्या हाती; AAP च्या बैठकीत नाव ठरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 11:58 IST

दिल्लीच्या राजकीय उलथापालथीत नव्या मुख्यमंत्रिपदाची निवड करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल यांच्यानंतर ही कमान एका महिलेच्या हाती देण्यात आली आहे.

नवी दिल्ली - देशाची राजधानी दिल्लीची पुन्हा एकदा कमान महिलेच्या हाती गेली आहे. आम आदमी पक्षाच्या बैठकीत नव्या मुख्यमंत्रिपदासाठी अतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. आज आपच्या आमदारांची बैठक पार पडली त्यात अतिशी मार्लेना यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली. अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सोडल्यानंतर दिल्लीत नवीन मुख्यमंत्री कोण अशी चर्चा सुरू होती. त्यात अतिशी यांचं नाव पुढे आले आहे. 

नव्या मुख्यमंत्रिपदाच्या निवडीसाठी अरविंद केजरीवाल यांच्या घरी सर्व आमदारांची बैठक झाली. आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे राजीनामा देतील त्यानंतर अतिशी या नव्या मुख्यमंत्री म्हणून दिल्लीचा कार्यभार सांभाळतील.  संध्याकाळी ४.३० वाजता केजरीवाल उपराज्यपाल विनय सक्सेना यांची भेट घेऊन त्यांना राजीनामा सुपूर्द करतील. त्यानंतर नव्या मुख्यमंत्रिपदासह इतर मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडेल. आमदारांच्या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला त्यावर सर्वांनी एकमताने मंजुरी दिली. 

सुनीता केजरीवाल यांच्या नावाची होती चर्चा

अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल मुख्यमंत्री बनतील अशी चर्चा होती. मात्र केजरीवालांची राजकीय कारकिर्द पाहता ते सुनीता केजरीवालांना मुख्यमंत्री बनवणार नाहीत. ते त्यांच्या मंत्रिमंडळातील अनुभवी अथवा इतर सहकाऱ्याला मुख्यमंत्री बनवू शकतात असं आप पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी म्हटलं होते. 

अतिशी दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री

दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून अतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. सुरुवातीपासून त्यांचे नाव आघाडीवर होते. अतिशी या पंजाबी राजपूत कुटुंबातून येतात आणि त्यांनी ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीतून पदवीचं शिक्षण पूर्ण केले आहे. २०२० साली अतिशी पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर २०२३ साली त्या केजरीवाल सरकारमध्ये मंत्री झाल्या. आता वर्षभरातच त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे आली. 

अतिशी या केजरीवाल यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक आहेत. अण्णा हजारे यांच्या आंदोलनापासून त्या संघटनेत सक्रीय आहेत. सध्या त्यांच्याकडे सर्वाधिक मंत्रालयाचा कारभार होता. केजरीवाल जेव्हा जेलमध्ये गेले तेव्हापासून संघटना ते सरकार सर्व पातळीवर त्यांनी मोर्चा सांभाळला. मुख्यमंत्रिपदासाठी ज्या नावांची चर्चा होती त्यात कैलाश गहलोत, गोपाल राय आणि सौरभ भारद्वाज यांच्याही नावाची चर्चा होती.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप