शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

भीषण, भयंकर! ...अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; १७ सेकंदाचा अंगावर काटा आणणारा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 10:32 IST

Delhi Building Collapse : ढिगाऱ्याखाली अडकल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी आहेत.

दिल्लीतील मुस्तफाबाद परिसरात एक मोठी दुर्घटना घडली आहे. रात्री २:३०-३:०० च्या सुमारास एक चार मजली इमारत अचानक कोसळली. मिळालेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली अडकल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी आहेत. इमारत कोसळल्याने लोक ढिगाऱ्याखाली अडकले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे ज्यामध्ये इमारत कोसळताना दिसत आहे.

 १७ सेकंदाचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ आहे. इमारत कोसळताच सर्वत्र धूळ उडालेली पाहायला मिळते. अतिरिक्त डीसीपी संदीप लांबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. चांदनी, दानिश, रेश्मा आणि नावेद अशी मृतांची नावे आहेत. सध्या १८ जणांना बाहेर काढण्यात आलं आहे, त्यापैकी १४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही लोक अजूनही ढिगाऱ्याखाली दबलेले असण्याची शक्यता आहे.

एनडीआरएफ, डॉग स्क्वॉड, दिल्ली पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या टीम मदत आणि बचाव कार्यात गुंतल्या आहेत. स्थानिक लोक बचाव कार्यात मदत करत आहेत. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, इमारत जुनी नव्हती, चांगल्या स्थितीत होती, परंतु भूखंड 'एल' शेपमध्ये होता जो इमारत कोसळण्याचं कारण असू शकतो. दिल्ली अग्निशमन दलाच्या एका कर्मचाऱ्याने सांगितलं की, आम्हाला २:५० वाजता इमारत कोसळल्याची माहिती मिळाली. जेव्हा आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा संपूर्ण इमारत कोसळली होती आणि लोक ढिगाऱ्याखाली अडकले होते. एनडीआरएफ, दिल्ली अग्निशमन सेवा लोकांना वाचवण्यासाठी काम करत आहेत.

या दुर्घटनेवर मुस्तफाबादचे भाजपा आमदार मोहन सिंह बिष्ट म्हणाले की, "मी दोन महिन्यांपूर्वी सांगितलं होतं की, या इमारतीसोबत एखादी दुर्घटना घडू शकते. आता इमारत कोसळली आहे. जाणीवपूर्वक दुर्घटना घडवण्यात आली आहे. येथे बांधकाम कायद्यांकडे लक्ष दिले जात नाही. अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. मुस्तफाबादमध्ये सर्वत्र बेकायदेशीर इमारती बांधल्या जातात." 

टॅग्स :delhiदिल्लीBuilding Collapseइमारत दुर्घटना