शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली ब्लास्ट केस: मोठी कारवाई! हल्द्वानीतून मौलाना कासमीला अटक; उमरचे कॉल डिटेल्स ठरले महत्त्वाचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 10:31 IST

दहशतवादी उमर-उन-नबी याचे कॉल डिटेल्स खंगाळल्यानंतर सुरक्षा यंत्रणांचे धागेदोरे थेट उत्तराखंडपर्यंत पोहोचले.

दिल्लीतील रेड फोर्टजवळ झालेल्या भीषण कार बॉम्बस्फोटाच्या तपासाला एक मोठे वळण मिळाले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने आणि दिल्ली पोलिसांनी संयुक्त कारवाई करत हल्द्वानी, उत्तराखंड येथून एका मशिदीच्या इमामला अटक केली आहे. दहशतवादी उमर-उन-नबी याचे कॉल डिटेल्स खंगाळल्यानंतर सुरक्षा यंत्रणांचे धागेदोरे थेट उत्तराखंडपर्यंत पोहोचले आणि हल्द्वानीच्या बनभूलपुरा भागातून मौलाना कासमीला ताब्यात घेण्यात आले आहे.

'बिलाली मशिदी'चा मौलाना कासमी NIAच्या जाळ्यात

दिल्लीतील कार बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू असतानाच, या प्रकरणाचे उत्तराखंड कनेक्शन समोर आले आहे. १० नोव्हेंबर २०२५ रोजी लाल किल्ल्याजवळ झालेल्या या आत्मघाती हल्ल्यात १५ निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. या हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

या घटनेतील मुख्य आरोपी आणि आत्मघाती बॉम्बर मानल्या जाणाऱ्या डॉ. उमर-उन-नबी याच्या कॉल डिटेल्सची कसून तपासणी सुरू असताना, त्याचे काही संपर्क थेट उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील बनभूलपुरा भागाशी जोडले गेल्याचे सुरक्षा यंत्रणांच्या लक्षात आले. या महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारे, शुक्रवारी २९ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आणि एलआययूच्या टीमने बनभूलपुरा भागात धडक दिली.

रात्री उशिरा दबिश, इमामला घेतले ताब्यात

पोलिसांनी बनभूलपुरा येथील 'बिलाली मशिदी'चे इमाम मौलाना कासमी यांना त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले आहे. अत्यंत गुप्तता पाळून ही कारवाई करण्यात आली असून, पुढील चौकशीसाठी त्यांना दिल्लीला नेण्यात आले आहे. इमाम मौलाना कासमी यांचा दिल्ली ब्लास्टमध्ये नेमका काय रोल आहे, याबद्दल सुरक्षा यंत्रणांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जारी केलेली नाही. मात्र, एका दहशतवादी प्रकरणातील आरोपीचे थेट मशिदीच्या इमामशी असलेले कनेक्शन समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

बनभूलपुरा भागात तणाव, कडक पोलीस बंदोबस्त

या कारवाईनंतर बनभूलपुरा भागात शनिवारी सकाळी मोठे पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. एसपी सिटी मनोज कुमार कत्याल आणि सीओ दीपशिखा अग्रवाल यांच्यासह मोठा पोलीस ताफा बिलाली मशिदीजवळ दाखल झाला होता. अचानक एवढ्या मोठ्या संख्येने पोलीस दिसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शहरभर सघन तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

अटकेतील आरोपींची संख्या ९ वर

राष्ट्रीय तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत असून हल्द्वानीतून झालेली ही अटक ९वी अटक आहे. यापूर्वी, २० नोव्हेंबर रोजी ६ जणांना अटक करण्यात आली होती, तर २८-२९ नोव्हेंबरच्या दरम्यान हल्द्वानी येथून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. मौलाना कासमी यांच्या अटकेमुळे या मोठ्या दहशतवादी कटातील आणखी काही महत्त्वाचे दुवे उलगडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :delhiदिल्लीBlastस्फोटterroristदहशतवादी