शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

दिल्ली बनली ‘गॅस चेंबर’!, रविवारपर्यंत शाळांना सुटी; नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 2:55 AM

प्रदूषण कमी करण्यासाठी तातडीचा उपाय म्हणून सरकार रस्त्यावर पाणी शिंपडणे, व्हॅक्युम क्लिनिंगचा प्रयोग करणे, चार चाकी वाहनांचा वापर कमी करणे तसेच दिल्लीत कचरा जाळण्यास बंदीबाबत विचार करीत आहे.

विकास झाडे/ टेकचंद सोनवणेनवी दिल्ली : दिल्लीत घेतला जाणारा प्रत्येक श्वास विषारी झाला असून, राजधानीची स्थिती गॅस चेंबरसारखी झाली आहे. खुल्या हवेत श्वास घेणेही कठीण झाले असून, लोक मास्क लावून बाहेर पडत आहेत. प्रदूषित हवेमुळेशाळकरी विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाल्याने उप-मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी रविवारपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. घनटाद धुक्यामुळे पंजाब, हरयाणा व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात झालेल्या अपघातांमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे.सर्वसाधारण हवेच्या तुलनेत २० पट घनदाट आणि प्रदूषणाचे मिश्रण असलेला स्मॉग दिल्लीत पसरलेला आहे. यामुळे दिवसा दृश्यमानता कमी झाली होती. स्मॉगमध्ये फिरताना अनेकांच्या डोळ्यांची जळजळ होत होती. अनेकांना श्वसनाचे, खोकल्याचे विकार होत आहेत. डोळ्यांमध्ये आग होणे, अंगाला खाज सुटण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. गतवर्षीेच्या तुलनेत यंदा प्रदूषण जास्त आहे. त्यामुळे सकाळी कामाशिवाय बाहेर पडणे, फिरायला जाणे तसेच मैदानावर खेळण्याचे टाळा, असे आवाहन सिसोदिया यांनी केले.स्थानिकांसाठी सरकारने मार्गदर्शिका प्रसिद्ध केली आहे. अस्थमा, दम्याचा विकार असलेले वृद्ध, शाळकरी मुले-मुली घरातच बसून आहेत. प्रदूषणामुळे अस्थमा, दमा, फुप्फुस्सांचे विकार, डोळ्यांची जळजळ तसेच मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. स्थिती कायम राहिल्यास वाहतुकीसाठी सम-विषम नियमाची अंमलबजावणी करण्याचे संकेत सिसोदिया यांनी दिले. वाहनतळाचे शुल्क चार पट वाढविण्याचे आदेश दिले आहेत.समोरचे काहीच दिसेना झाल्याने२० वाहने एकमेकांवर आदळलीस्मॉगमुळे पंजाब, हरियाणा व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात झालेल्या अपघातांमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला. पंजाबमध्ये चालकाच्या शून्य दृश्यमानतेमुळे पुलावर उभ्या असलेल्या सात शाळकरी विद्यार्थ्यांना ट्रक धडकला. ज्यात चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले. यमुना एक्स्प्रेस-वेवर एकापाठोपाठ २० वाहने एकमेकांवर आदळली. ज्यामुळे वाहतूककोंडी झाली.उपाय काय?प्रदूषण कमी करण्यासाठी तातडीचा उपाय म्हणून सरकार रस्त्यावर पाणी शिंपडणे, व्हॅक्युम क्लिनिंगचा प्रयोग करणे, चार चाकी वाहनांचा वापर कमी करणे तसेच दिल्लीत कचरा जाळण्यास बंदीबाबत विचार करीत आहे.हरित लवादाने घेतले फैलावरराष्टÑीय हरित लवादाने प्रदूषण वाढणार असल्याची माहिती असतानादेखील उपाययोजना का केली नाही, असा सवाल करीत उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, पंजाब या राज्यांच्या प्रशासनाला फैलावर घेतले आहे. पुढील दोन दिवसांत यासंबंधी उपाययोजना करण्याचे निर्देश लवादाने संबंधित राज्यांना दिले आहेत.गडकरी सरसावले!जड वाहनांमुळे होणारे प्रदूषण ५० टक्क्यांनी कमी करण्यासाठी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी २७० किमीच्या रिंग रोडचे ८५ टक्के काम युद्धपातळीवर पूर्ण केले आहे. त्यामुळे जड वाहनांना शहरात येण्याची गरज राहणार नाही. दिल्लीच्या सर्व दिशांना व्यापणाºया २७० किमी अंतराचा पूर्व आणि पश्चिम परिघाकृती एक्स्प्रेस-वेचे डिसेंबरमध्ये लोकार्पण करण्यात येईल. हा मार्ग वाहतुकीस खुला झाल्यास उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, जम्मू-काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेशमध्ये जाणारी वाहने नव्या मार्गाने दिल्लीबाहेरून जातील. या मार्गामुळे ५० टक्के प्रदूषण कमी होईल, असा विश्वास गडकरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.दिल्लीतस्मॉग का?मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना बैठकीचे आवाहन केले आहे. दोन्ही राज्यांतील शेतकरी शेतातील तण जाळतात, त्या धुरामुळे प्रदूषणात वाढ होते.प्रदूषणाचा सामना करण्यासाठी या तीनही राज्यांमध्ये समन्वय महत्त्वाचा आहे. याशिवाय उत्तर प्रदेश आणि राजस्थान सरकारचीही मदत आवश्यक आहे.