शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: "बाप तो बाप रहेगा..."; विजयानंतर आतिशी यांचा जोरदार रोड शो अन् जबरदस्त डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 22:49 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर मावळत्या मुख्यमंत्री आतिशी यांनी डान्स करत आपला आनंद व्यक्त केला.

Delhi Assembly Elections Result: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा हादरा बसला आहे. सत्ताधारी आम आदमी पक्षाला केवळ २२ जागा मिळवता आल्या. निवडणुकीत आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल,  मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, सौरभ भारद्वाज आणि इतर अनेक बडे नेतेही पराभूत झाले आहेत. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी पराभव स्वीकारला असून आपण लोकांसाठी काम करत राहू असे म्हटले आहे. दुसरीकडे आपच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी विजय मिळवला आहे. आतिशी यांनी भाजपच्या रमेश बिधुरींचा पराभव केला आहे. विजयानंतर आतिशी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत 'बाप तो बाप रहेगा' या गाण्यावर जोरदार डान्सही केला.

आपच्या प्रमुख नेत्या आतिशी यांनी कालकाजी विधानसभा जागेवर विजय मिळवला. आतिशी यांनी भाजपच्या रमेश बिधुरी यांचा ३५०० हून अधिक मतांनी पराभव केला आहे. आतिशी यांच्या विजयामुळे भाजपच्या विधानसभेत आपला आवाज उठवण्याची संधी मिळणार आहे. दिल्लीतून सरकार गेल्याने एकीकडे आपचे नेते चिंतेत असताना दुसरीकडे आतिशी आणि त्यांच्या समर्थकांनी नाचत आपला विजय साजरा केला. आतिशी यांच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मावळत्या मुख्यमंत्री आतिशी जेव्हा त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या तेव्हा त्यांच्या समर्थकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. आतिशी यांनी आपल्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांच्या मतदारसंघात भव्य रोड शो केला. आतिशी यांनी वाहनात बसून लोकांचे आभार मानले. यावेळी त्यांचे समर्थक विविध गाण्यांवर डान्स करत होते. एका व्हिडीओमध्ये आतिशी यादेखील 'बाप तो बाप रहेगा' या गाण्यावर डान्स करताना दिसल्या.

आतिशी यांचा व्हिडिओ शेअर करत आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी टोला लगावला आहे. "हे कसलं निर्लज्ज प्रदर्शन आहे? पक्षाचा पराभव झाला आहे, सर्व मोठे नेते हरले आहेत आणि आतिशी मार्लेना असा आनंद साजरा करत आहेत," असं स्वाती मालीवाल यांनी म्हटलं. 

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवाल