शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

"दिल्लीचा मराठी माणूस पंतप्रधान मोदींच्या पाठीशी"; भाजपच्या विजयानंतर CM फडणवीसांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 18:47 IST

आपच्या दारुण पराभवानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.

Delhi Assembly Elections 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून भाजपने २७ वर्षांनंतर दिल्लीत पुनरागमन केल्याचे आता स्पष्ट झालं आहे. दुसरीकडे आम आदमी पक्षालाही मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला असून पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल  मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, सौरभ भारद्वाज आणि इतर अनेक बडे नेतेही पराभूत झाले आहेत. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी पराभव स्वीकारला असून आपण लोकांसाठी काम करत राहू असे म्हटले आहे. दुसकीकडे या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं असून आम आदमी पक्षाला धक्का बसला आहे. त्यामुळे आता दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया या दोन मोठ्या नेत्यांचाही पराभव झाला आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटलेला आहे, असं म्हटल. तसेच भाजपचे सरकार दिल्लीमध्ये लोकांच्या आशा आकांक्षा निश्चितपणे पूर्ण करेल असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

"दिल्ली विधानसभेवर २७ वर्षांनी भाजपचा झेंडा रोवला गेला याचा मला अतिशय आनंद आहे. दिल्लीतील भाजपच्या तमाम कार्यकर्त्याचा आणि जनतेचे मी मनापासून अभिनंदन करतो. दिल्लीकरांनी हा विश्वास पंतप्रधान मोदी यांच्यावर दाखवला आहे. या विजयाने आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटलेला आहे. सातत्याने खोटी आश्वासने देऊन आणि लोकांना भटकवत ज्या प्रकारे त्यांनी राज्य केलं त्या परंपरेचा आज अंत झालेला आहे.  खोटे राजकारण चालणार नाही हे दिल्लीच्या जनतेने दाखवून दिलं आहे. मला विश्वास आहे की दिल्लीची जनता लोकसभेतही पंतप्रधान मोदींवरच विश्वास दाखवायची, पण विधानसभेमध्ये आमची कुठेतरी पिछेहाट झाली होती. आता एक मोठा विजय हा दिल्लीतल्या जनतेने दिला आहे. हे विकासाला दिलेलं मत आहे. भारतीय जनता पार्टीचे सरकार हे दिल्लीमध्ये लोकांच्या आशा आकांक्षा निश्चितपणे पूर्ण करेल," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"अरविंद केजरीवाल यांनी अण्णा हजारे यांचा हात पकडून भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या माध्यमातून आपलं राजकारण सुरू केलं होतं. त्यानंतर ते भ्रष्टाचाराचे आयकॉन बनले. त्याचे उत्तर दिल्लीच्या जनतेने दिलं आहे. येणाऱ्या दिवसात भाजप दिल्लीकरांच्या जीवनात नक्कीच परिवर्तन आणेल," असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"माझ्या प्रचाराचा निवडणुकीवर परिणाम झालेला नाही. लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देण्याचे ठरवलं होतं. मला एवढाच आनंद आहे की या यज्ञामध्ये एखादी समिधा माझी पण आहे. त्यात दिल्लीचा मराठी माणूस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभा राहिला याचा मला मनापासून आनंद आहे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसArvind Kejriwalअरविंद केजरीवाल