शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

"दिल्लीला 'घालमेल' नव्हे तर..."; द्वारका येथील सभेतून पंतप्रधान मोदी यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 17:55 IST

delhi assembly elections 2025 : "दिल्लीला आधुनिक बनवण्याची भाजपची इच्छा आहे. याची एक झलक द्वारकेत दिसते. केंद्र सरकारने येथे भव्य यशोभूमी तयार केली आहे."

दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. नेतेमंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच, "यावेळी 'आप-दा' वाल्यांना घालवायचे आणि भारतीय जनता पक्षाला मोठ्या बहुमताने निवडून द्यायचे, असे दिल्लीतील जनतेने ठरवले आहे. तसेच, आता दिल्लीकरांना 'घालमेल' नव्हे तर 'ताळमेळ' असलेले सराकर अहवे आहे," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते शुक्रवारी दिल्लीतील द्वारका येथे एका रॅलीला संबोधित करत होते.

मोदी म्हणाले, "मी जेव्हा-जेव्हा द्वारकेला येतो, तेव्हा-तेव्हा मला भगवान श्रीकृष्णाच्या द्वारका नगरीची आठवण येते, हे स्वाभाविक आहे. गुजरातमधील द्वारकेची सेवा करण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य आहे. दिल्लीला आधुनिक बनवण्याची भाजपची इच्छा आहे. याची एक झलक द्वारकेत दिसते. केंद्र सरकारने येथे भव्य यशोभूमी तयार केली आहे."

'संपूर्ण प्रदेश स्मार्ट सिटी बनेल' -मोदी पुढे म्हणाले, “आगामी काळात हा संपूर्ण प्रदेश एक प्रकारची स्मार्ट सिटी बनेल. जगभरातून लोक इथे येतील, पर्यटन, व्यापार, व्यवसाय, सर्वकाही भरभराटीला येईल. येथे केंद्रातील भाजप सरकार भारत वंदना पार्क तयार करत आहे, जे संपूर्ण देशासाठी एक आदर्श ठरणार आहे. विकसित भारताची राजधानी अशीच असायला हवी. केवळ दिल्ली शहरच नाही, तर दिल्लीच्या ग्रामीण भागातील गावांसाठीही मॉडेल बनवले जाईल, हे काम भाजप करेल.

सर्वांना संधी दिली, आता भाजपला संधी द्या -“दिल्ली एका सुरात म्हणत आहे, 'अब की बार भाजपा सरकार'. दिल्लीला केंद्र आणि राज्यात डबल इंजिन सरकारची आवश्यकता आहे. प्रथम आपण काँग्रेस पाहिली, नंतर आम आदमी पक्षाने दिल्लीत कब्जा केला. आता मला डबल इंजिन सरकार बनवून दिल्लीची सेवा करण्याची संधी द्या. मी गॅरंटी देतो की, भाजप सरकार दिल्लीच्या विकासात कोणत्याही प्रकारची कसर सोडणार नाही. गेल्या 11 वर्षांत 'आप-दा' ने केवळ सर्वांसोबत भांडणेच केली आहेत. हे 'आप-दा' केंद्र सरकार, हरियाणा आणि उत्तर प्रदेश वाल्यासोबत लढत राहतात," असेही मोदी यावेळी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDelhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025BJPभाजपाAAPआप