शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

'आप'नं 15 आमदारांचं तिकीट कापलं, मनीष सिसोदियांनी सांगितलं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 15:22 IST

आम आदमी पार्टीने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत 14 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने सर्व 70 जागांसाठी उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे पार्टीकडून 15 विद्यमान आमदारांना या निवडणुकीत उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे पार्टीच्या आमदारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. 

याविषयी बोलताना दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे वरिष्ठ नेते मनीष सिसोदिया यांनी सांगितले की, पार्टीकडून आपल्या स्तरावर सर्व आमदारांच्या कामाचा सर्व्हे करण्यात आला आणि जनतेने दिलेल्या प्रतिसादानुसार तिकिटांचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ज्यांचे तिकीट कापण्यात आले आहे, ते आता कोणताही आरोप करत आहेत. त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही, असे मनीष सिसोदिया यांनी एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. 

दुसऱ्या पक्षातील नेत्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला आहे. यावर बोलताना मनीष सिसोदिया यांनी सांगितले की, ज्या लोकांना काँग्रेस आणि भाजपा यासारख्या पक्षांतून निराशा मिळाली आहे, ते आम आदमी पार्टीत आले आहेत. त्यांची लोकांध्ये असलेली प्रतिमा पाहून त्यांना निवडणूकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला.  

याचबरोबर, बदरपूरचे आमदार राहिलेले नारायण दत्त शर्मा यांनी आम आदमी पार्टीवर तिकिट व्रिकीचा आरोप केला आहे. याविषयी मनीष सिसोदिया म्हणाले, "ज्यावेळी कोणाचेही तिकीट कापले जाते, त्यावेळी त्याला थोडीफार निराशा होते. नारायण दत्त शर्मा यांना काही शंका असल्यास आम्ही चर्चेतून दूर करू," याशिवाय, या निडणुकीत आम आदमी पार्टीचा सर्व जागांवर विजय होईल. 70 पैकी 70 जागा आम्ही जिंकू आणि हा तर जनतेचा आवाज आहे. यावेळी तीन जागा सुद्धा सुटणार नाहीत, असेही मनीष सिसोदिया यांनी सांगितले. 

(भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले, '...तर राजकारणातून संन्यास घेईन')

आम आदमी पार्टीने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत 14 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून तर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे पतपरगंज येथून  निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची जोरदार तयारी सुरु केली आहे. 70 सदस्यसंख्या असलेल्या दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

2015 मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने 67 जागा जिंकत निर्विवाद विजय मिळवला होता. भाजपाला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले होते. तर काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नव्हता. 

महत्त्वाच्या बातम्या 

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले, '...तर राजकारणातून संन्यास घेईन'  

CAA: मोदींच्या गुजरातमध्ये विरोधाचे पतंग गुल; उडवण्यापूर्वीच पोलिसांकडून जप्त

अर्जुनाच्या बाणांमध्ये होती अणुशक्ती! बंगालच्या राज्यपालांचा दावा

सीएएवर मलेशियाच्या पंतप्रधानांची आगपाखड, भारत असा शिकवणार धडा

शिवसेनेने केली भाजपसोबत हातमिळवणी; महाविकास आघाडीला फासला हरताळ

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्लीdelhi electionदिल्ली निवडणूक