शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मंदिर आणि गुरुद्वारांमधील पुजाऱ्यांना दरमहा 18 हजार रुपये; अरविंद केजरीवालांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 15:00 IST

Delhi Assembly Election 2025 : आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवालांनी मोठी घोषणा केली आहे.

Delhi Assembly Election 2025 : आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आज (30 डिसेंबर) एक मोठी घोषणा केली. पुजारी-ग्रंथी सन्मान योजनेंतर्गत दिल्लीतील सर्व मंदिरांमध्ये काम करणारे पुजारी आणि गुरुद्वारांमध्ये काम करणाऱ्या ग्रंथींना(पुजारी) दरमहा 18 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. 

पुजारी-ग्रंथी सन्मान योजना या योजनेची घोषणा करताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, हे देशात पहिल्यांदाच घडत आहे. दिल्लीत आम्ही अनेक गोष्टी केल्या, चांगल्या शाळा बांधल्या, चांगली रुग्णालये उभारली, महिलांसाठी बस प्रवास मोफत केला. आता आम्ही राज्यात पुरोहितांसाठी सन्मान योजना सुरू करत आहोत. अनेक शतकांपासून पुजारी देवाची पूजा करतात, आपली परंपरा चालवत आले आहेत. आतापर्यंत आपण पुजाऱ्यांकडे कधीच लक्ष दिले नाही. आता या योजनेच्या माध्यमातून आम्ही त्यांचा सन्मान करणार आहोत.  

उद्यापासून नोंदणी सुरूकेजरीवाल पुढे म्हणाले, या योजनेसाठी उद्यापासून, म्हणजेच 31 डिसेंबरपासून नोंदणी सुरू होईल. मी उद्या हनुमान मंदिरात जाऊन तेथील पुजाऱ्यांची नोंदणी करुन योजनेची सुरुवात करेन, त्यानंतर दिल्लीतील आपचे सर्व आमदार आणि कार्यकर्ते मंदिरे आणि गुरुद्वारांमध्ये जाऊन पुजाऱ्यांची नोंदणी सुरू करतील.

भाजपने रोखण्याचा प्रयत्न करू नयेयावेळी केजरीवालांनी भाजपवर निशाणा साधला. मी भाजपला हात जोडून विनंती करतो की, त्यांनी महिला सन्मान योजना बंद करण्यासाठी पोलीस पाठवले, पण ते थांबवू शकले नाहीत, त्यांनी संजीवनी योजना बंद करण्याचा प्रयत्न केला, पण थांबवू शकले नाहीत, आता त्यांनी पुजारी-ग्रंथी योजना रोखण्याचा प्रयत्न करू नये. तुम्ही यापूर्वी अनेक पापे केली, आता भाजपचे आणखी पाप करू नये, असा इशारा त्यांनी दिला.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्लीElectionनिवडणूक 2024