शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

निवडणुकीसाठी देणगी मागणाऱ्या आतिशींकडे किती संपत्ती? समोर आला आकडा; नावाचं कंफ्यूजन दूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 17:42 IST

गेल्या काही वर्षांपासून, त्याच्या नावाच्या पाटीवर केवळ 'आतिशी' एवढेच नाव लिहिलेले दिसत होती. त्या सोशल मीडियावरही त्यांचे आडनाव लिहित नाहीत...

राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. यातच आता, निवडणूक लढवण्यासाठी जनतेकडे देणगी मागणाऱ्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या संपत्तीचा खुलासा झाला आहे. महत्वाचे म्हणजे, त्यांच्या नावासंदर्भा असलेले कन्फ्यूजनही दूर झाले आहे. आतिशी यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांचे संपूर्ण नाव 'आतिशी मार्लेना' असल्या सांगण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून, त्याच्या नावाच्या पाटीवर केवळ 'आतिशी' एवढेच नाव लिहिलेले दिसत होती. त्या सोशल मीडियावरही त्यांचे आडनाव लिहित नाहीत. तसेच त्यांनी आपली एकूण संपत्ती ७६.९३ लाख रुपये असल्याचेही जाहीर केले आहे.

आतिशी यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात, आपल्या नावावर एकूण  76.93,374.98 एवढी जंगम मालमत्ता असल्याचे म्हटेल आहे. यात 30 हजार रुपये कॅश आणि 1 लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिण्यांचा समावेश आहे. तर उरलेले जवळपास 75 लाख रुपए बँकेच्या बचत खात्यात आणि एफडीच्या स्वरुपात आहेत. तसेच शपथपत्रानुसार, त्यांच्या जवळ कुठलीही अचल संपत्ती नाही, कुठलेही घर अथवा कार नाही.

आतिशी मार्लेना यांनी म्हटले आहे की, २०२३-२४ मध्ये त्यांचे एकूण उत्पन्न ९,६२,८६० रुपये, तर २०२२-२३ मध्ये ४,७२,६८० रुपये एवढे होते. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत कालकाजी मतदारसंघातून निवडणूक लढवताना त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांची एकूण मालमत्ता १,४१,२१,६६३ रुपये असल्याचे जाहीर केले होते. तेव्हा, त्यात पतीच्या मालमत्तेचा उल्लेख होता. यावेळी त्यांनी केवळ स्वतःच्याच मालमत्तेची माहिती दिली आहे.

आतिशी पुन्हा एकदा कालकाजी मतदारसंघातूनच निवडणूक लढवत आहेत. त्यांनी निवडणूक खर्चासाठी क्राउड फंडिंगचे आवाहन केले आहे. निवडणूक लढवण्यासाठी आपल्याला ४० लाख रुपयांची गरज असल्याचे आतिशी यांनी म्हटले आहे. त्याना पहिल्याच दिवशी सुमारे १७ लाख रुपयांची मदत अथवा देणगी मिळाली आहे. दिल्लीतील सर्व ७० जागांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. आतिशी काँग्रेसच्या अलका लांबा आणि भाजप उमेदवार रमेश बिधुरी यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत आहेत.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025AtishiआतिशीAam Admi partyआम आदमी पार्टी