शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
5
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
6
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
7
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
8
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
9
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
10
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
14
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
15
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
16
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
17
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
18
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर

अवध ओझा निवडणुकीच्या रिंगणात; मनीष सिसोदियांच्या मतदारसंघातून लढणार, सिसोदियांच काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 14:39 IST

Delhi Assembly Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी AAP ने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे.

Delhi Assembly Election 2025 : दिल्लीत पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने (AAP) तयारीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता पक्षाने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 20 उमेदवारांची नावे सामील आहेत. विशेष म्हणजे, यावेळी 'आप'नेदिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या मनीष सिसोदिया (Manish Sisodiya) यांचा मतदारसंघ बदलला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आपने यंदा मनीष सिसोदिया यांना पटपडगंज मतदारसंघाऐवजी जंगपुरा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच 'आप'मध्ये दाखल झालेले UPSC शिक्षक अवध ओझा (Avadha Ojha) यांना सिसोदियांच्या पटपडगंजमधून तिकीट देण्यात आले आहे. याशिवाय राखी बिरला यांचाही मतदारसंघ बदलण्यात आला आहे. 

यादीतील तीन नावांची बरीच चर्चाया यादीत असे तीन चेहरे आहेत, ज्यांना तिकीट कुठून मिळणार यावरुन बरीच चर्चा होती. पहिले नाव होते शिक्षणतज्ञ अवध ओझा यांचे. ते निवडणूक लढवणार की नाही, अशी अटकळ बांधली जात होती, मात्र आता ते मनीष सिसोदिया यांच्या पटपडगंजमधून निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे. सिसोदिया सलग तीन वेळा या जागेवरून आमदार म्हणून निवडून आले आहेत. गेल्या निवडणुकीत ते अत्यंत कमी मताधिक्याने विजयी झाले होते.

दुसरे नाव प्रवेश रतन यांचे आहे. प्रवेश रतन हे जाटव समाजातील आहेत. ते भाजपमधून 'आप'मध्ये आले आहेत. त्यांनी भाजपच्या तिकिटावर पटेल नगर (राखीव) जागेवरून मागील निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा आपचे राजकुमार आनंद यांनी पराभव केला. आता राजकुमार आनंद यांनी आप सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या यादीत तिसरे नाव जितेंद्र सिंह शांती यांचे आहे. शांती यांनी शाहदरा येथून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना आपच्या रामनिवास गोयल यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळी गोयल यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे.

'आप'च्या उमेदवारांची दुसरी यादी

1. नरेला- दिनेश भारद्वाज2. तिमारपुर- सुरेंद्र पाल सिंह बिट्टू3. आदर्श नगर- मुकेश गोयल4. मुंडका- जसबीर कराला5. मंगोलपुरी- राकेश जाटव धर्मरक्षक6. रोहिणी- प्रदीप मित्तल7. चांदनी चौक- पुनर्दीप सिंह साहनी (सैबी)8. पटेल नगर- प्रवेश रतन9. मादीपुर- राखी बिड़लान10. जनकपुरी- प्रवीण कुमार11. बिजवासन- सुरेंद्र भारद्वाज12. पालम- जोगिंदर सोलंकी13. जंगपुरा- मनीष सिसौदिया14. देवली- प्रेम कुमार चौहान15. त्रिलोकपुरी- अंजना पारचा16. पटपड़गंज- अवध ओझा17. कृष्णा नगर- विकास बग्गा18. गांधी नगर- नवीन चौधरी (दीपू)19. शाहदरा- पदमश्री जितेंदर सिंह शंटी20. मुस्तफाबाद- आदिल अहमद खान

यापूर्वी आम आदमी पक्षाने आपल्या पहिल्या यादीत 11 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. या यादीत असे सहा उमेदवार होते, जे नुकतेच काँग्रेस आणि भाजपमधून 'आप'मध्ये सामील झाले आहेत.

आपची पहिली यादी

1. छतरपूर- ब्रह्मसिंह तन्वर 2. किरारी-अनिल झा- 3. विश्वास नगर-दीपक सिंगला 4. रोहतास नगर- सरिता सिंग5. लक्ष्मी नगर-बीबी त्यागी 6. बदरपूर- राम सिंह 7. सीलमपूर-झुबेर चौधरी 8. सीमापुरी- वीर सिंग धिंगन9. घोंडा- गौरव शर्मा 10. करावल नगर- मनोज त्यागी 11. मतियाला- सोमेश शौकीन

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्ली