नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी जनता दल (यू) चे हरिवंश नारायण सिंह हे सत्ताधारी भाजपाचे उमेदवार असू शकतील. पण राज्यसभेच्या लोक लेखा समितीच्या दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत त्यांचा दारूण पराभव झाला. विरोधकांचा पाठिंबा असलेले तेलगू देसमचे सी. रमेश व भाजपाचे भूपेंद्र यादव निवडून आले. सी. रमेश यांना १0६, भूपेंद्र यादव यांना ६९ तर सिंह यांना अवघी २६ मतेच मिळाली.आता राज्यसभेची निवडणूक ९ आॅगस्ट रोजी होत असून, त्यासाठी गुरुवारी १२ वाजेपर्यंत अर्ज भरायचे आहे. राज्यसभेची सदस्यसंख्या २४५ असून, उपसभापतीपदी निवडून येण्यासाठी १२३ मतांची गरज आहे. रालोआकडे १0५ सदस्य असून, ६ अपक्षांचा पाठिंबा आहे. अण्णा द्रमुक व अन्य काही सदस्य भाजपाला मदत करतील, अशी अपेक्षा आहे. या पदासाठी भाजपासाठी हरिवंश नारायण सिंह यांच्या नावाची चर्चा आहे. विरोधकांतर्फे बिजू जनता दल वा तृणमूलचा उमेदवार असेल. सारे विरोधक एकत्र आल्यास त्यांची संख्या १२२ पर्यंत जाऊ शकेल. त्यामुळे त्यावेळी कशी समीकरणे बनतात, याकडे सर्र्वाचे लक्ष लागले आहे.
रालोआच्या उमेदवाराचा लेखा समितीत पराभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 04:16 IST