शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मला गप्प बसविण्यासाठी विरोधकांकडून बदनामीचे खटले - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 04:20 IST

नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी... या सर्वांचे मोदी हेच समान आडनाव कसे काय? सर्वच चोरांचे आडनाव मोदी का असते? असे राहुल गांधी म्हणाले होते.

सुरत : मला गप्प बसविण्यासाठी राजकीय विरोधक बदनामीचे खटले दाखल करीत आहेत, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केली आहे. बदनामीच्या खटल्याच्या सुनावणीसाठी ते गुरुवारी येथे आले होते.नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी... या सर्वांचे मोदी हेच समान आडनाव कसे काय? सर्वच चोरांचे आडनाव मोदी का असते? असे राहुल गांधी म्हणाले होते. लोकसभा निवडणुकांत कर्नाटकत १३ एप्रिल रोजी झालेल्या प्रचारसभेत त्यांनी हे वक्तव्य केले होते. त्यामुळे मोदी समाजाची बदनामी झाली आहे, असा आक्षेप घेत सुरतमधील भाजपचे आमदार पीयूष मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर खटला दाखल केला आहे.आपण कोणताही गुन्हा केलेला नाही, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. या खटल्याच्या पुढील सुनावणीला वैयक्तिकरीत्या हजर न राहण्याची सवलत मिळण्यासाठी राहुल गांधी यांनी केलेला अर्ज मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी मंजूर केला. या खटल्याची पुढील सुनावणी १० डिसेंबरला आहे. या खटल्याच्या जुलैमध्ये झालेल्या सुनावणीस उपस्थित राहू शकणार नसल्याची राहुल गांधी यांनी केलेली विनंती न्यायालयाने मान्य केली होती. त्यानंतर पुढील सुनावणी १० आॅक्टोबर रोजी ठेवली होती. राहुल गांधी यांच्या सूरत दौºयाच्या पार्श्वभूमीवर गुजरात राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित चावडा यांनी स्थानिक कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. (वृत्तसंस्था)भिवंडीत न्यायालयातही खटला- रा. स्व. संघाची बदनामी केल्याचा आरोप करीत भिवंडीतील न्यायालयातही राहुल गांधी यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे.- रा. स्व. संघाच्या लोकांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या केली आणि आता भाजपचे लोक गांधीजींच्या नावाचा वापर करीत असतात.या लोकांनी सरदार वल्लभभाई पटेल व गांधीजींना विरोध केला होता, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान भिवंडीतील प्रचारसभेत केले होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी