शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

दीपिका, जॅकलीन, सोनाक्षी, राणी ‘बीपीएल’मध्ये!

By admin | Updated: September 2, 2016 02:18 IST

बॉलीवुड तारका दीपिका पदुकोन, जॅकलीन फर्नांडिस, सोनाक्षी सिन्हा आाणि राणी मुखर्जी भलेही मुंबईतील बहुमजली इमारतीत रहात असतील; परंतु, त्यांच्या नावे बीपीएल रेशन कार्ड

फरुखाबाद : बॉलीवुड तारका दीपिका पदुकोन, जॅकलीन फर्नांडिस, सोनाक्षी सिन्हा आाणि राणी मुखर्जी भलेही मुंबईतील बहुमजली इमारतीत रहात असतील; परंतु, त्यांच्या नावे बीपीएल रेशन कार्ड (दारिद्य्ररेषेखालील लोकांसाठीची शिधापत्रिका) काढण्यात आले असून त्यावर रेशनही वितरीत केले जात आहे. उत्तरप्रदेशातील फरुखाबाद जिल्ह्यात हा प्रकार सुरू होता. साहबगंज गावातील जागरुक नागरिकांनी ही बाब प्रशासनाच्या नजरेस आणून दिली. या गावातील दारिद्यरेषेखालील लोकांना देण्यात येणारे अंत्योदय रेशनकार्डधारकांत दीपिका पदुकोन, जॅक्लीन फर्नांडिस, सोनाक्षी सिन्हा आण राणी मुखर्जी यांची नावे समाविष्ट असून त्यांच्या नावे रेशन हडप करण्यात येत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. उपजिल्हाधिकारी अजीत कुमार यांनी केलेल्या चौकशीत या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले. कुमार यांनी चौकशीचा अहवाल जिल्हाधिकारी प्रकाश बिंदू यांच्याकडे सादर केला. या अहवालानुसार, १६९ कुटुंबांसाठी रेशनकार्ड तयार करण्यात आले असून त्यातील ४० रेशनकार्ड अंत्योदय श्रेणीचे आहेत. यातील काही कार्ड बॉलीवुड तारकांच्या नावे असून कार्डवर त्या सर्व विवाहीत असल्याचे सांगण्यात आले आहे. दीपिकाचे नाव सामान्य श्रेणीच्या आदीत आहे तर उर्वरित अभिनेत्रींची नावे अंत्योदय श्रेणीच्या यादीत होते. या गडबडीला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तारकांच्या नसलेल्या पतींचीही नावेया अहवालानुसार, गावातील १६९ कुटुंबासाठी रेशनकार्ड तयार करण्यात आले असून त्यातील ४० रेशनकार्ड अंत्योदय श्रेणीचे आहेत. यातील काही कार्ड बॉलीवुड तारकांच्या नावे असून कार्डवर त्या सर्व विवाहीत असल्याचे सांगण्यात आले आहे. एवढेच नाहीतर त्यांच्या नावाच्या पुढे त्यांच्या पतीचे नावही टाकण्यात आले आहे. रेशनकार्डवर दीपिका पदुकोन पती राकेश चंद्र, जॅकलीन फर्नांडिस पती साधुलाल, राणि मुखर्जी पती राम स्वरूप आणि सोनाक्षी सिन्हा पती रमेशचंद्र अशी नावे आहेत.