शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

डीपफेक लोकशाहीसाठी धोका; सरकार कठोर कारवाई करणार, अश्विनी वैष्णव यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 14:54 IST

केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज अनेक सोशल मीडिया कंपन्यांसोबत बैठक घेतली. यात डीपफेकच्या मुद्द्यावर सखोल चर्चा करण्यात आली.

DeepFake Technology: मागील काही दिवसांपासून डीपफेक फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओच्या वाढत्या प्रकरणाबाबत सरकार सावध झाले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अनेक सोशल मीडिया कंपन्यांसोबत बैठक घेतली आणि हे टाळण्यासाठी काही निर्णय घेतले. डीपफेक फक्त समाजासाठीच नाही, तर लोकशाहीसाठीही मोठा धोका असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

एआयचा गैरवापर करून सोशल मीडियावर बनावट व्हिडिओ व्हायरल केले जाताहेत. या तंत्रज्ञानाचा वाढता धोका पाहता केंद्र सरकार लवकरच कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. सरकार याबाबत कठोर नियम आणू शकते, ज्यामध्ये कठोर कारवाईची तरतूद असेल, असे मानले जात आहे. केंद्र सरकारने सोशल मीडिया कंपन्यांना कारवाई करून कठोर कायदे करण्यासही सांगितले आहे. यासाठी वैष्णव यांनी चार मुख्य गोष्टींवर कंपन्यांसोबत काम करण्याचे मान्य केले आहे. 

पत्रकार परिषदेत अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, डीपफेक मोठा सामाजिक धोका असल्याचे कंपन्यांनी मान्य केले आहे. हे टाळण्यासाठी सरकार आणि कंपन्या कोणत्या मुद्द्यांवर काम करतील याचाही केंद्रीय मंत्र्यांनी उल्लेख केला. 1-डीपफेक कसे तपासायचे? 2-ते व्हायरल होण्यापासून कसे रोखायचे? 3-युजर त्याची तक्रार कुठे करू शकतो आणि त्यावर त्वरित कारवाई कशी केली जाईल? 4-त्याच्या धोक्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी सर्वजण एकत्र कसे कार्य करू शकतात? या चार गोष्टींवर प्रामुख्याने चर्चा झाली.

काही प्लॅटफॉर्म तयार आहेतअलीकडेच प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, पीएम मोदी आणि सारा तेंडुलकरसह अनेक सेलिब्रिटींचा डीपफेक व्हिडिओ, फोटो व्हायरल झाले होते. तेव्हापासून हा मुद्दा चर्चेत आला  आहे. पत्रकार परिषदेत अश्विनी वैष्णव म्हणाले की, अशा व्हिडिओंची चौकशी करण्यासाठी काही प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले आहेत, परंतु आम्हाला यापेक्षा जास्त गरज आहे. अशा व्हिडिओंविरोधात लवकरच कायदा करण्यात येईल आणि योग्य तांत्रिक पावले उचलली जातील, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

आणखी अनेक बैठका या मुद्द्यावर आणखी अनेक बैठका होतील. या विषयावर पुढील बैठक डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्या बैठकीत आढावा घेऊन पाठपुरावा केला जाईल. जो कोणी डीपफेक व्हिडिओ प्रसारित करेल, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. मात्र, यासंबंधीचा कोणताही कायदा अद्याप लागू झालेला नाही. डीपफेकच्या मुद्द्याने केवळ भारतातच नाही, तर जागतिक स्तरावरही चिंता वाढली आहे. डीपफेकशी संबंधित कायद्यावर अनेक प्रकारच्या सूचना आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ashwini Vaishnawअश्विनी वैष्णवArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सtechnologyतंत्रज्ञानCentral Governmentकेंद्र सरकारcyber crimeसायबर क्राइम