शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

निर्दोष खटले घोषित करणे सक्तीचे, निवडणूक अर्जात द्यावी लागेल माहिती : कर्नाटक हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 06:41 IST

मुडिअप्पा हे २७ डिसेंबर २०२० रोजी बागलकोट जिल्ह्यातील बेवूर ग्रामपंचायतीसाठी निवडून आले.

- डॉ. खुशालचंद बाहेती

बंगळुरू : निवडणूक उमेदवारी अर्जामध्ये उमेदवाराने निर्दोष मुक्तता झालेले किंवा रद्दबातलसह  सर्व गुन्हेगारी प्रकरणे उघड करणे आवश्यक असल्याचे कर्नाटक हायकोर्टाने म्हटले आहे.

मुडिअप्पा हे २७ डिसेंबर २०२० रोजी बागलकोट जिल्ह्यातील बेवूर ग्रामपंचायतीसाठी निवडून आले. पराभूत उमेदवाराने त्यावर आक्षेप घेत केलेल्या अर्जावर, मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी निर्दोष सुटलेल्या प्रकरणाचा खुलासा मुडिअप्पा यांनी उमेदवारी अर्जात केला नाही म्हणून त्यांची निवडणूक रद्द केली. या आदेशाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले. उमेदवारी अर्जात शिक्षा झालेल्या आणि प्रलंबित गुन्ह्यांची माहिती देणेच आवश्यक आहे, असा युक्तिवाद करण्यात आला.

निवडणुकीच्या निकालावर प्रत्यक्ष परिणाम झाला तरच निवडणूक रद्द ठरवली जाऊ शकते. निर्दोष प्रकरणाची माहिती जाहीर न केल्याने असा कोणताही परिणाम होत नाही असा युक्तिवादही करण्यात आला. हायकोर्टाने हे म्हणणे फेटाळले व मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांचा निर्णय कायम केला.

हायकोर्ट काय म्हणाले?सर्वोच्च न्यायालयाने सर्व फौजदारी कारवाईचा खुलासा करण्याचे निर्देश दिले असल्याने यामध्ये निर्दोष ठरलेल्या प्रकरणाचाही समावेश होतो. मतदारांना उमेदवाराची माहिती मिळण्यासाठी  सर्व माहिती उघड करणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे उमेदवाराला कायद्याची कलमे, इतर सर्व सहआरोपी कोण आहेत, तक्रारदार कोण आहे, निकालाचे स्वरूप, निकालाची तारीख, अपील दाखल केले असल्यास त्याचा तपशील आणि कार्यवाही रद्द केली गेली असेल तर तसे उघड करावे लागेल.

टॅग्स :Courtन्यायालय