शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

येडियुरप्पांनी घेतलेले निर्णय तूर्त तरी राहणार अधांतरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:41 IST

मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेताच येडियुरप्पा यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा अंमलात येणार का, हे उद्या, शनिवारी त्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करता येते का, यानंतरच स्पष्ट होईल.

बंगळुरू : मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेताच येडियुरप्पा यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा अंमलात येणार का, हे उद्या, शनिवारी त्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करता येते का, यानंतरच स्पष्ट होईल. बहुमत सिद्ध करेपर्यंत कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाने येडियुरप्पांना बजावले आहे.येडियुरप्पा यांनी शपथविधीनंतर काल लगेचच अतिरिक्त मुख्य सचिवपदी एम. लक्ष्मीनारायण यांची नेमणूक केली आणि त्यांच्याकडे गृह खात्याची जबाबदारी दिली. त्याखेरीज त्यांनी काही आयएएस व आयपीएस अधिकाºयांच्या बदल्या केल्या. बहुमत सिद्ध होण्याआधी हे करण्याची काय गरज होती, असा सवाल हे अधिकारीच विचारत आहेत. या बदल्यांचे काय होणार, हे मात्र अद्याप स्पष्ट व्हायचे आहे.शेतकºयांचे १ लाख रुपयांपर्यंतची कर्जे माफ करण्याची घोषणाही त्यांनी केली. ती लगेच अंमलात येणारच नाही. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास मदत व्हावी, यासाठी एका अँग्लो इंडियन सदस्याची नेमणूक करण्याच्या दृष्टीनेही येडियुरप्पा यांनी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यांनी राज्यपालांकडे एका नावाची शिफारस केली होती आणि राज्यपाल वजुभाई वाला यांनी त्यास संमतीही दिली होती. त्यालाही सर्वोच न्यायालयाच्या निर्णयामुळे खो बसला आहे. बहुमत सिद्ध होईपर्यंत ही नेमणूक करता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.गुप्तचर तसेच भ्रष्टाचारविरोधी विभागातील महत्त्वाच्या जागांवर आपल्याला हव्या त्या अधिका-यांना आणण्याचे काम येडियुरप्पा यांनी एका आदेशाद्वावारे केले होते. बदल्यांच्या या निर्णयांना धोरणात्मक निर्णय म्हणायचे की प्रशासकीय निर्णय म्हणायचे, असा प्रश्न अधिकाºयांनाच पडला आहे. शिवाय हा प्रशासकीय निर्णय असला तरी त्याची आता अंमलबजावणी केल्यास न्यायालयाकडून बोलणी ऐकून घ्यावी लागतील, अशी भीती अधिकाºयांना वाटत आहे. एक अधिसूचना काढून येडियुरप्पा यांनी या बदल्या केल्या आहेत. गुप्तचर विभाग आणि भ्रष्टाचार विरोधी ब्युरो या महत्त्वाच्या ठिकाणी त्यांच्या मजीर्तील अधिका?्यांना आणल्याचं सांगण्यात येतं.दरम्यान, येडियुरप्पा यांना कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचं आजच सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे येडियुरप्पा यांनी घेतलेले निर्णय बाद ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.>खेळी उधळली गेलीराज्यघटनेच्या अनुच्छेद ३३३ अन्वये विधानसभेवर एका अँग्लो इंडियन सदस्याची नियुक्ती करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. त्या नावाची शिफारस सरकार करते. पण बहुमत सिद्ध होण्याआधी ही नियुक्ती करणे योग्य नाही, असे नमूद करीत काँग्रेसने त्यास आक्षेप घेतला होता. या आमदाराचा उपयोग बहुमत सिद्ध करण्यासाठीच केला जाणार, हे उघड होते. पण न्यायालयाने ही खेळीच उधळून लावली.

> या निर्णयांना बसला खोलगेचच अतिरिक्त मुख्य सचिवपदी एम. लक्ष्मीनारायण यांची नेमणूक, त्यांच्याकडे गृह खात्याची जबाबदारी काही आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या शेतक-यांचे १ लाख रुपयांपर्यंतची कर्जे माफ करण्याची घोषणा एका अँग्लो इंडियन सदस्याची नेमणुकीसाठी राज्यपालांकडे नावाची शिफारस गुप्तचर तसेच भ्रष्टाचारविरोधी विभागात महत्त्वाच्या जागांवर सोयीच्या अधिकाºयांना आणण्यासाठी काढला आदेश

टॅग्स :Yeddyurappaयेडियुरप्पा