शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

फ्लेक्स फ्युअल इंजिनाच्या निर्णयावर दोन दिवसात स्वाक्षरी, नितीन गडकरी यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 10:24 IST

इंधनाच्या वाढणाऱ्या किमती आणि प्रदूषणाच्या दृष्टीने केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी फ्लेक्स इंधनावर आधारित इंजिनावर भर दिला आहे.

नवी दिल्ली : इंधनाच्या वाढणाऱ्या किमती आणि प्रदूषणाच्या दृष्टीने केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी फ्लेक्स इंधनावर आधारित इंजिनावर भर दिला आहे. आता कार कंपन्यांना फ्लेक्स इंधन इंजिन अनिवार्य करण्यासंबंधी गडकरी लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे.फ्लेक्स इंजिनामध्ये एकापेक्षा जास्त इंधनाचा वापर करता येऊ शकताे. पारंपरिक जीवाश्म इंधनावर भारताचे सुमारे ८५ टक्के अवलंबन आहे. दरवर्षी सुमारे ८ लाख काेटी रुपयांचे कच्चे तेल भारत आयात करताे. या इंधनावर अवलंबन कायम राहिल्यास हा आकडा पुढील काही वर्षांनी २५ लाख काेटी रुपयांवर जाऊ शकताे. त्यामुळे पुढील दाेन-तीन दिवसांमध्ये यासंबंधी एका आदेशावर स्वाक्षरी करणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. गडकरी म्हणाले की, हे इंधन प्रदूषण करणार नाही. याचे उत्पादन आपल्या शेतकऱ्यांनी केलेले असेल. 

१५-२० दिवसांनी दिसणार एक खास गाडीनितीन गडकरी यांनी भारतीय शास्त्रज्ञांचे काैतुक करताना सांगितले की, १५ ते २० दिवसांमध्ये माझ्याकडे एक खास गाडी दिसेल. ही गाडी ग्रीन हायड्राेजन म्हणजेच पाण्यापासून हायड्राेजन आणि ऑक्सिजनला वेगळे करून चालेल. लाेकांचा विश्वास बसणार नाही. पण, मी प्रत्यक्षात त्या गाडीत बसल्यानंतरच मी सांगताे, त्यावर विश्वास बसेल. वाया जाणाऱ्या पाण्यापासून महापालिका ग्रीन हायड्राेजन इंधन बनवतील आणि देशातील गाड्या त्यावर धावतील.   

काय आहे फ्लेक्स फ्युअल?फ्लेक्स फ्युअल हे पेट्राेल आणि मिथेनाॅल किंवा इथेनाॅल यांच्या संयाेगातून बनविण्यात येते. भारतात पेट्राेलमध्ये ८.५ टक्के इथेनाॅल ब्लेंडिंग करण्यात येते. दाेन वर्षांमध्ये हे प्रमाण २० टक्के करण्यात येणार आहे. म्हणूनच फ्लेक्स फ्युअल इंजिनांची निर्मिती आवश्यक आहे. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी