शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसशी चर्चा करूनच घेऊ निर्णय; मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच - मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 05:08 IST

विधानसभा निवडणुकीच्या आम्ही जनादेश मागितला होता, पण जनतेने तो न दिल्याने आमचे सरकार काँग्रेसवर अवलंबून आहे, असे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केला

बंगळुरू : विधानसभा निवडणुकीच्या आम्ही जनादेश मागितला होता, पण जनतेने तो न दिल्याने आमचे सरकार काँग्रेसवर अवलंबून आहे, असे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केला. अर्थात, आमच्या पक्षाने जाहीरनाम्यात दिलेले शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा आपण नक्कीच अंमलात आणू, असेही त्यांनी स्पष्ट केले.‘राज्यात केवळ माझ्या पक्षाचे सरकार नाही. जनता दलाला स्पष्ट बहुमत मिळावे, असे आमचेआवाहन होते. तसे घडले नाही. त्यामुळे आज मी काँग्रेसच्या कृपेवर अवलंबून आहे. मी राज्यातील साडेसहा कोटी लोकांच्या दबावाखाली नाही,’ असेही त्यांनी नमूद केले. स्पष्टीकरण कुमारस्वामी यांनी दिले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर केंद्रीय मंत्र्यांची भेट घेण्यासाठी ते दिल्लीला रवाना झाले. त्या आधी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, शेतकºयांचे कर्ज माफ करण्यास माझे प्राधान्य असेल. शेतकºयांना कर्जमाफी देण्यास अयशस्वी ठरलो, तरमी पदाचा राजीनामा देईन. आता आमचे सरकार काँग्रेस व जनतादलाचे मिळून आले. त्यामुळे काँग्रेस नेत्यांशी चर्चा करूनच सारे निर्णय होणे स्वाभाविक आहे, पण त्यामुळे शेतकºयांच्या कर्जमाफीबाबत मी ठाम आहे. त्यांच्याशी चर्चा करून आठवडाभरात तो निर्णय घेतला जाईल.कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्री व काँग्रेसचे जी. परमेश्वर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असली आणि त्यांनी बहुमत सिद्ध केले असले, तरी अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार मात्र झालेला नाही. काँग्रेसमध्ये मंत्रिपदाचे अनेक नेते इच्छुक आहेत. त्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी ठरवतील, तेच मंत्री होतील. हा निर्णय राहुल गांधी पुढील आठवड्यात परदेशातून परत येणार असून, त्यानंतर हा निर्णय होण्याची शक्यता आहे.राजघाटावर पुष्पांजलीनवी दिल्ली : कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कुमारस्वामी प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज दिल्लीत भेटले. त्यानंतर, त्यांनी दुपारी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांच्या राजघाट या समाधीस्थळावर जाऊन तिथे पुष्पांजली वाहिली.शेतकºयांची कर्जमाफीचे आश्वासन पाळण्यात मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या कथित अपयशाबाबत भाजपाने पुकारलेल्या बंदला सोमवारी अल्प प्रतिसाद मिळाला. शाळा, कॉलेज, सार्वजनिक परिवहन सेवा सुरू होती.बहुतांश शेतकरी, कन्नड समर्थक संस्थांनी या बंदला समर्थन दिलेले नाही. म्हैसूरमध्ये आंदोलन करणारे भाजपाचे खासदार प्रताप सिम्हा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८