शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संसदेत वाद, जनतेचे ११८ कोटी रुपये स्वाहा ! लोकसभेत फक्त ३७ तास काम, ८४ तास वाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 15:05 IST

राज्यसभेत देखील केवळ ४१ तासच झाले संसदीय कामकाज

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरवरील चर्चा आणि बिहारमधील मतदार याद्यांच्या पडताळणीच्या मुद्द्यांवर विरोधकांनी पहिल्या दिवसापासून घातलेला गोंधळ आणि सरकारकडून किरकोळ चर्चा होत थेट १५ विधेयके मंजूर झाल्याची इतिहासात नोंद होत संसदेचे पावसाळी अधिवेशन गुरुवारी अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. या अधिवेशात १२० तासांचे काम होणे अपेक्षित असताना केवळ ३७ तास काम झाले. लोकसभेत केवळ ३१ टक्के, तर राज्यसभेत ३९ टक्के काम झाले. गदारोळामुळे दोन्ही सभागृहात एक दिवसही प्रश्नोत्तराचा तास आणि शून्य तास सुरळीतपणे झाला नाही. एकाही दिवसासाठी कोणत्याही सभागृहात गैर-सरकारी कामकाज झाले नाही.

अध्यक्ष विरोधकांवर नाराज

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाजात अडथळा आणल्याबद्दल विरोधकांवर नाराजी व्यक्त केली. नियोजित पद्धतीने कामकाज बिघडवले गेले, असे त्यांनी म्हटले.

या विषयांवर झाले संसदेत घमासान

दोन्ही सभागृहात एसआयआरच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी, या मागणीवर विरोधकांनी गोंधळ घातला. सभागृहात सांगितले गेले की, हा विषय न्यायालयात प्रलंबित आहे आणि चर्चेला परवानगी नाही. तरी गोंधळ कायम होता.

ऑपरेशन सिंदूरवर चर्चा

'ऑपरेशन सिंदूर'वर दोन्ही सभागृहात विशेष चर्चा झाली. या चर्चेला पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत आणि गृहमंत्री शाह यांनी राज्यसभेत उत्तर दिले. लोकसभेत ७३ आणि राज्यसभेत ६५ सदस्यांनी या चर्चेत भाग घेतला. ही चर्चा १६ तास चालली होती.

धनखड यांचा राजीनामा

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव संध्याकाळी उशिरा राष्ट्रपतींना राजीनामा सादर केला. तो स्वीकारण्यात आला.

जनतेचे ११८ कोटी पाण्यात

संसदेत १२० तास कामकाज होणे अपेक्षित असताना ते ३७ तास झाले. म्हणजेच ४,९८० मिनिटे काम झाले नाही. संसद अधिवेशनादरम्यान प्रत्येक मिनिटासाठी सरासरी २.५ लाख रुपये खर्च येतो. कामकाज वाया गेल्याने जनतेचे सरासरी ११८ कोटी पाण्यात गेले.

अधिवेशनात नेमके किती काम?

  • कामकाजासाठी तास होते - १२०
  • लोकसभेत झालेले कामकाज - ३७ तास
  • राज्यसभेत झालेले कामकाज - ४१.१५ तास
  • वाया गेलेले तास - ८४
  • एकूण मंजूर विधेयके - १५
  • लोकसभेत विधेयके सादर - १४
टॅग्स :Parliamentसंसद