शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
3
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
4
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
5
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
6
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
7
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
8
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
9
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
11
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
12
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
13
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
14
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
15
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
16
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
17
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
18
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
19
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
20
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप

वास्कोत चोरट्यांच्या हल्ल्यात दोन महिलांचा मृत्यू (((((शंका))))

By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST

चोरांकडून दोन महिलांचा खून

चोरांकडून दोन महिलांचा खून
वास्कोतील घटना : एक महिला जखमी; मांगोर हिल येथील फ्लॅटमध्ये चोरी
..................................
एक महिला जखमी : मांगोर हिल येथील फ्लॅटमध्ये चोरी
वास्को : दरोडे व चोर्‍यांचा तपास लागत नसल्याने चोरटे मुजोर बनले असून वास्कोत एका फ्लॅटमधील ऐवज लंपास करताना चोरांनी दोन महिलांचा गळा दाबून खून केल्यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली असून वास्कोतील रहिवाशांत घबराट निर्माण झाली आहे. जखमी महिलेवर उपचार सुरू असल्याने चोरीच्या ऐवजाचा तपशील मिळालेला नाही.
राज्यात गेल्या काही दिवसांत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. विशेषत: दक्षिण गोव्यात चोरट्यांचा उच्छाद वाढला असून नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. मांगोर हिल-वास्को येथील श्री कामत पॅलेस को ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीच्या एका फ्लॅटमध्ये गुरुवारी उत्तररात्री झालेल्या जबरी चोरीत दोन महिलांना जीव गमवावा लागला. सिद्धार्थ नामदेव नाईक यांच्या मालकीच्या डुप्लेक्स फ्लॅटमध्ये चोरांनी प्रवेश करून सासू (उषा नामदेव नाईक, ५८) व एका सुनेचा (नेहा सिद्धार्थ नाईक, २८) गळा दाबून खून केला, तर दुसर्‍या सुनेला ((((((((((((प्रतिमा प्रवीण नाईक (((((((२म))))))))))))) मारहाण करत ऐवज लांबवून पोबारा केला. जखमीवर चिखलीतील खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. या मारहाणीत प्रतिमाकडे असलेल्या नेहाच्या सहा महिन्यांच्या मुलीला कोणतीही इजा झाली नाही.
शुक्रवारी पहाटे ४ वाजता सोसायटीमधील अभय गजानन पाटील यांनी वास्को पोलिसांना याबाबत माहिती दिली. यासंदर्भात पाटील यांनी नोंदविलेल्या तक्रारीनुसार, पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास प्रतिमा नाईक जखमी अवस्थेत सहा महिन्यांच्या पुतणीसह आरडाओरड करत फ्लॅटमधून खाली आल्या. त्यांनी काही फ्लॅटधारकांची दारे ठोठावून जागे केले व आपल्या फ्लॅटमध्ये चोरी झाल्याचे सांगितले़ सोसायटीचे पदाधिकारी श्रीनिवास राव व चिटणीस बाबूराव अनंत नाईक यांनी आत जाऊन पाहिले असता, त्यांना उषा नाईक या बाहेरील हॉलमध्ये, तर वरच्या माळ्यावर असलेल्या बेडरुममध्ये नेहा नाईक बेशुद्धावस्थेत जमिनीवर पडल्याचे आढळले़ तसेच बेडरुम व स्वयंपाकघराच्या बाजूला असलेली दोन कपाटे उघडी असल्याचे व त्यातील कपडे व इतर साहित्य अस्ताव्यस्तपणे जमिनीवर टाकल्याचे दिसून आले़
त्यानंतर इमारतीतील रहिवाशांनी पोलिसांना तसेच १०८ रुग्णवाहिकेला कल्पना दिल्यावर रुग्णवाहिकेतील परिचारकाने बेशुद्धावस्थेत असलेल्या सासू-सुनेची तपासणी केली असता, त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर वास्को पोलीस स्थानकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक निखील पालयेकर यांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह चिकित्सेसाठी मडगावच्या हॉस्पिसिओ इस्पितळात पाठवून दिले़ दोन्ही मृतदेहांवर कसल्याही जखमा नसल्याने त्यांचा गळा दाबूनच खून करण्यात आला असावा, असा कयास आहे.
उषा नाईक या नेहा सिद्धार्थ नाईक या सुनेसह या फ्लॅटमध्ये राहत होत्या. दुसरी सून प्रतिमा नाईक हीसुद्धा अधूनमधून या फ्लॅटमध्ये राहते़ उषा हिचे सिद्धार्थ व प्रवीण हे दोन्ही मुलगे विदेशात जहाजावर कामाला असतात़ सध्या सिद्धार्थ फि लिपिन्स येथे, तर प्रवीण अमेरिकेत असून दोघांनाही या घटनेची पोलिसांनी तसेच नातेवाईकांनी माहिती दिली आहे.
या हल्ल्यात जखमी झालेली प्रतिमा गुरुवारी सासरी राहाण्यास आली होती़ जाऊ नेहा हिला सर्दी झाल्याने तिच्या सहा महिन्यांच्या मुलीला प्रतिमाने आपल्याजवळ झोपविले होते़ मध्यरात्रीनंतर तिला जवळच्या खोलीतून किंचाळल्याचा आवाज आला. ती त्या खोलीत आली असता, एका चोराने ती ओरडू नये म्हणून तोंड दाबून धरले़ दरम्यान, चोरट्यांनी तिच्यावरही हल्ला केला़ यात ती बेशुद्ध झाली. काही वेळाने शुद्धीवर आली असता, घरातील स्थिती पाहून तिला चोरी झाल्याचे आढळले. त्यानंतर तिने इमारतीतील इतर रहिवाशांना याची माहिती दिली़ चोरांनी तिच्या डोक्यावर आघात केल्याने ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार चालू आहेत.

फ्लॅटचे मुख्य दार कुणी उघडले?
श्री कामत पॅलेस को ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीची ही इमारत मांगोर हिल भागात एका टोकाला असून त्यापुढे जाण्यासाठी रस्ताही नाही. या इमारतीच्या दुसर्‍या माळ्यावर हा एकमेव डुप्लेक्स फ्लॅट असून या फ्लॅटमध्ये जाण्यासाठी स्वतंत्र जिना आहे़ त्यामुळे या फ्लॅटमध्ये येणार्‍या-जाणार्‍याची कल्पना इतरांना येत नाही़ इमारतीच्या सोसायटीने रखवालदाराची नेमणूकही केलेली नाही. तसेच सीसीटीव्हीचीही व्यवस्था नाही़ त्यामुळे चोरांचे फावले. या फ्लॅटमध्ये कुणीही पुरुष व्यक्ती राहात नसल्याची माहिती मिळाल्यामुळे चोरांनी त्याचा फ ायदा उठवला असावा.
हल्ला झाल्यानंतर प्रतिमा नाईक शुद्धीवर आल्या, त्या वेळी पहाटेचे ४ वाजले होते़ त्यामुळे मध्यरात्रीनंतर ही घटना घडल्याची शक्यता आहे़ मात्र, चोरट्यांना घरात प्रवेश करण्यासाठी फ्लॅटचे मुख्य दार कुणी उघडले, याबाबत शंका उपस्थित होत आहे. ही घटना घडण्याच्या पूर्वसंध्येला या फ्लॅटमध्ये घरगुती सिलिंडर गॅसची दुरुस्ती करणारे दोन कामगार आले होते. ते गेल्यानंतर फ्लॅटच्या दाराची चावी गायब झाल्याचे नाईक कुटुंबीयांच्या निदर्शनास आले होते़ या चावीचाच उपयोग करून चोरांनी प्रवेशद्वार उघडले असण्याचा किंवा रात्री डोअर बेल वाजल्यामुळे बाहेरच्या खोलीतच झोपलेल्या उषा नाईक यांनी दार उघडले असावे, असाही अंदाज व्यक्त होत आहे़
हल्ल्याबाबत माहिती कळताच गोवा पोलीस खडबडून जागे झाले असून पणजी मुख्यालयातील सर्व ज्येष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली़ तसेच काही पोलीस स्थानकांवरील निरीक्षकांनाही घटनास्थळी बोलवून तपासकामात मदत घेण्यात येत आहे़ पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग, उपमहानिरीक्षक व्ही़ रंगनाथन, अधीक्षक कार्तिक कश्यप, उपअधीक्षक सुभाष गोलतेकर, मोहन नाईक, रवी देसाई, सिद्धांत शिरोडकर, संदेश चोडणकर, विश्वेश कर्पे, व्ही़ वेळुसकर आदी अधिकारी उपस्थित होते़ या सर्वांनी एकत्रितपणे या हल्ल्याचा तपास करण्याबाबत पावले उचलली आहेत. (प्रतिनिधी)

फ ोटो आहे : ३००१ वीएएस ०१
ओळी : १़ श्री कामत पॅलेस हॉउसिंग सोसायटीची इमारत.
२़ हल्लेखोरांनी कपाटे फ ोडून कपाटातील अस्ताव्यस्त टाकलेले साहित्य.
३़ पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांनी भेट देऊन पाहणी केली़
४़ नेहा नाईक
५़ उषा नाईक

(छाया : अनिल चोडणकर)