स्वाईन फ्लूचे मृत्यूसत्र कायम
By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST
पुणे : शहरात मंगळवारी एकाचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून या आजारामुळे मृत्यूमुखी पडणार्यांची संख्या शहरात झपाट्याने वाढली असून या आजारामुळे पुण्यातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली आहे. यातील ३७ रुग्ण पुण्याच्या हद्दीतील असून ६४ रुग्ण हे हद्दीबाहेरील आहेत.
स्वाईन फ्लूचे मृत्यूसत्र कायम
पुणे : शहरात मंगळवारी एकाचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून या आजारामुळे मृत्यूमुखी पडणार्यांची संख्या शहरात झपाट्याने वाढली असून या आजारामुळे पुण्यातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली आहे. यातील ३७ रुग्ण पुण्याच्या हद्दीतील असून ६४ रुग्ण हे हद्दीबाहेरील आहेत. शहरातील ढगाळ हवामान आणि संसर्गजन्य आजारांसाठी पोषक असणारे वातावरण तसेच नागरीकांमध्ये या आजाराबाबत नसलेली जागृती आणि अस्वच्छता ही शहरातील आजार वाढण्याची प्रमुख कारणे आहेत. सर्दी, खोकला, ताप ही प्राथमिक लक्षणे दिसणार्या रुग्णांनी आरोग्याकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहनही महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. तसेच या आजाराबाबत नागरिकांमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने रुग्ण खासगी व शासकीय रुग्णालयात धाव घेत आहेत. आज दिवसभरात स्वाईन फ्लूच्या आजारासाठी १००० रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यातील १२८ जणांना टॅमी फ्लू हे स्वाईन फ्लूवरील औषध देण्यात आले आहे. यातील २८ जणांच्या कफाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असता ८ जणांना स्वाईनफ्लू असल्याचे निश्चित झाले. जानेवारी २०१५ पासून शहरातील स्वाईन फ्लू झालेल्या रुग्णांची संख्या आज ९१५वर पोहोचली असून आज स्वाईन फ्लूच्या १६ रुग्ण व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. ---------------