अनोळखी तरुणाचा मृत्यू
By admin | Updated: October 30, 2016 22:45 IST
जळगाव: जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २५ वर्षीय अनोळखी तरुणाचा रविवारी दुपारी मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हा जिल्हा रुग्णालय परिसरातच वावरत होता.आजारी असल्याने तो रुग्णालयात दाखल झाला होता.
अनोळखी तरुणाचा मृत्यू
जळगाव: जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २५ वर्षीय अनोळखी तरुणाचा रविवारी दुपारी मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हा जिल्हा रुग्णालय परिसरातच वावरत होता.आजारी असल्याने तो रुग्णालयात दाखल झाला होता.पाच ट्रॅव्हल्सवर कारवाईजळगाव: बंदी असतानाही शहरात प्रवेश करुन प्रवाशांची चढ,उतार करणार्या पाच ट्रॅव्हल्सवर रविवारी सकाळी कारवाई करण्यात आली. आकाशवाणी चौक, स्टेडीयम परिसरात ही कारवाई झाली. कलम १२२ नुसार प्रत्येक ट्रॅव्हल्सला दोनशे रुपये दंड आकारण्यात आला.पोलीस अधीक्षक कार्यालयात शुकशुकाटजळगाव: दिवाळीनिमित्त सुटी असल्याने रविवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात शुकशुकाट होता. एरव्ही सुटी असली तरी या कार्यालयातील जिल्हा विशेष शाखा, नियंत्रण कक्ष, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस उपअधीक्षक कार्यालय व स्वागत कक्ष आदी ठिकाणी कर्मचारी कार्यरत असायचे, रविवारी बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी दिसून आले.