शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सात अतिरेक्यांचा खात्मा

By admin | Updated: October 7, 2016 06:23 IST

काश्मीरच्या कुपवाडा हंडवाडा भागातील ३0, राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्पवर पाक दहशतवाद्यांनी गुरुवारी पहाटे केलेला हल्ला परतवून लावण्यासाठी भारतीय जवानांनी जोरदार गोळीबार

श्रीनगर : काश्मीरच्या कुपवाडा हंडवाडा भागातील ३0, राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्पवर पाक दहशतवाद्यांनी गुरुवारी पहाटे केलेला हल्ला परतवून लावण्यासाठी भारतीय जवानांनी जोरदार गोळीबार केला. त्यात तीन दहशतवाद्यांना ठार मारले. तसेच आणखी तीन ठिकाणी झालेले दहशतवाद्यांनी केलेले घुसखोरीचे प्रयत्नही भारतीय सैन्याने उधळून लावले. नौगाम आणि रामपूर सेक्टरमधील तीन ठिकाणी घुसण्याचा दहशतवाद्यांनी केलेला प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सैन्याने केलेल्या कारवाईत चार दहशतवादी ठार झाले.

लंगेटच्या कॅम्पवर हल्ला करण्यासाठी अतिरेकी पाकिस्तानमधूनच आले होते. त्यांच्याकडील सर्व अत्याधुनिक शस्त्रांचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात भारतीय चलनही सापडले. त्यामुळे त्यांना स्थानिकांची मदत झाली असावी, असा अंदाज आहे. या अतिरेक्यांकडे पाकिस्तानची चिन्हे असलेली औषधेही होती. अतिरेक्यांनी पहाटे ५ वाजता कुपवाडा जिल्ह्यात लंगेट येथील राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्पवर गोळीबार सुरू केला. भारतीय जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिले. हा हल्ला उधळून लावल्यानंतर जवानांना तीन दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले.‘संपुआ’ सरकारच्या काळात केले गेलेचार वेळा ‘सर्जिकल स्ट्राइक्स’ - पवारयूपीए सरकारच्या काळातही चार वेळा पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक्स केले होते. पण त्याचा गवगवा केला नव्हता. अशा बाबी जाहीर करायच्या नसतात आणि त्याचे राजकारणही करायचे नसते, असे स्पष्ट करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आताच्या सर्जिकल स्ट्राइक्सचे व्हिडीओ फुटेज जारी करणे योग्य नाही, असे म्हटले आहे.मी सरळ विचार करणारा माणूस आहे. पण देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आला की मी वाकडाही विचार करू शकतो, असे सांगतानाच, सर्जिकल स्ट्राइक्सबद्दल शंका उपस्थित करणारे देशाशी एकनिष्ठ आहेत का, असा कधी कधी संशय येतो. - मनोहर पर्रीकर, केंद्रीय संरक्षणमंत्री