शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

काँग्रेससाठी फाशीचा फंदा!

By admin | Updated: October 5, 2015 12:24 IST

बिहार विधानसभा निवडणूक म्हणजे राष्ट्रीय जनता दलासाठी (राजद) ‘करो या मरो’ची लढाई झाली आहे. त्यामुळेच निवडणूक आयोगाच्या नोटीसला न जुमानता राजद

पाटणा : बिहार विधानसभा निवडणूक म्हणजे राष्ट्रीय जनता दलासाठी (राजद) ‘करो या मरो’ची लढाई झाली आहे. त्यामुळेच निवडणूक आयोगाच्या नोटीसला न जुमानता राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव ही निवडणूक म्हणजे सवर्ण आणि मागासवर्गीयांची लढाई असल्याचे सांगून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यांच्या या भूमिकेमुळे महाआघाडीत सहभागी काँग्रेसची अडचण मात्र वाढली आहे.यादव यांच्या जातीय कार्डमुळे काँग्रेसचे नेते आणि उमेदवार चिंतित आहेत. या मुद्द्यावर स्वत:ला राजदपासून दूर ठेवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. काँग्रेस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या शनिवारी कहलगाव (भागलपूर), वजीरगंज (गया) येथील सभा तसेच उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या ७ आॅक्टोबरला बछवाडा (बेगुसराय), बरबीघा (शेखपुरा) आणि चेनारी (रोहतास) येथे होणाऱ्या सभांसाठी राजदच्या कुठल्याही नेत्यास औपचारिक आमंत्रण देण्यात आलेले नाही. दुसरीकडे मागासवर्गीयांचे ध्रुवीकरण करण्याच्या राजदच्या उघड प्रयत्नांमुळे सवर्णांची मते गमविण्याच्या भीतीने काँग्रेस नेते सध्या ‘डॅमेज कंट्रोल’मध्ये व्यस्त आहेत. उच्चवर्णीयांमधील गरीब लोकांना आरक्षण देण्यास आपल्या पक्षाचा पाठिंबा असल्याचे काँग्रेसचे प्रसिद्धी प्रमुख रणदीपसिंग सुरजेवाला यांनी गुरुवारी स्पष्ट केले होते. २००९ आणि २०१४च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या जाहीरनाम्यातही याचा उल्लेख होता.काँग्रेसचे बहुतांश उमेदवार शहरी आणि निमशहरी भागातील असून, हा या पक्षासाठी सर्वांत चिंतेचा विषय आहे. कारण महाआघाडीत काँग्रेसला मिळालेल्या ४१पैकी १७ जागांवर निकालाचे भवितव्य सवर्णांच्या मतदानावर अवलंबून आहे; आणि या मतदारसंघांमध्ये काँग्रेसची थेट लढत भाजपासोबत आहे. त्यामुळे या जागांवरील काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे. सवर्ण आणि मागासवर्गीयांच्या आधारे मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी लालूप्रसाद यादव करीत असलेली वक्तव्ये थांबविण्याच्या दृष्टीने पक्षश्रेष्ठींनी दबाव आणावा अशी या उमेदवारांची इच्छा आहे. यादव यांची बयाणबाजी सुरू राहिल्यास पक्षाचे फार मोठे नुकसान होईल, अशी धोक्याची सूचना अनेक उमदवारांनी पत्राद्वारे दिली आहे. या मुद्द्यावर काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशीही या उमेदवारांची मागणी आहे. (वृत्तसंस्था)भाजपाची कसोटी- ४१पैकी २८ जागांवर काँग्रेसची लढत भाजपाशी आहे. यापैकी २३ मतदारसंघांत २०१०च्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार विजयी झाले होते. - याशिवाय पक्षाला संयुक्त जनता दलाकडून अशा १२ जागा मिळाल्या आहेत जेथे गेल्या निवडणुकीत भाजपासोबत असलेल्या संजदचे उमेदवार विजयी झाले होते. २०१० साली काँग्रेसला ४ जागांवर विजय मिळाला होता. परंतु २०१४च्या पोटनिवडणुकीत भागलपूरची जागा ताब्यात आल्याने या पक्षाची सदस्य संख्या ५ झाली. सवर्ण आणि मागासवर्गीयांबद्दल लालूप्रसाद यादव यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. काँग्रेसचा समाजातील प्रत्येक वर्गाला सोबत घेण्यावर विश्वास आहे. पक्षासाठी सांप्रदायिकता आणि विकास हा मुख्य मुद्दा आहे.- प्रेमचंद्र मिश्रा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते