शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सात लोकांना जिवंत जाळणा-याला मिळणार फाशीच, राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2018 16:13 IST

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एकाच कुटुंबातील सात जणांना जिवंत जाळणा-या व्यक्तीच्या दयेचा अर्ज फेटाळून लावला आहे.

नवी दिल्ली- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एकाच कुटुंबातील सात जणांना जिवंत जाळणा-या व्यक्तीच्या दयेचा अर्ज फेटाळून लावला आहे. राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यानंतर कोविंद यांच्याकडे पहिल्यांदाच दयेची याचिका दाखल करण्यात आली होती. बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील राघोपूर प्रखंड येथे ही क्रूर घटना 2006 रोजी घडली होती. ज्यात जगत राय नावाच्या नराधमानं म्हशींची चोरी केल्याच्या प्रकरणात विजेंद्र महतो आणि त्याच्या कुटुंबातील 6 जणांना जिवंत जाळलं होतं.महतो यानं सप्टेंबर 2005मध्ये म्हशींची चोरी झाल्याचा एक गुन्हा दाखल केला होता. ज्यात जगत राय, वजीर राय आणि अजय राय यांना आरोपी करण्यात आलं होतं. या आरोपींनी महतोवर गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव आणला होता. परंतु महतो यांनी गुन्हा काही मागे घेतला नाही. अखेर जगत रायनं महतोचं घर पेटवून दिलं. त्यात महतोची पत्नी आणि पाच मुलांचा भाजून मृत्यू झाला. आगीत होरपळल्यामुळे महतोंचाही काही महिन्यांनी मृत्यू झाला.या जळीत कांडात राय याला दोषी ठरवत स्थानिक न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर उच्च न्यायालयानं सुनावलेली ही शिक्षा सर्वोच्च न्यायालयानंही कायम ठेवली. अखेर राय यानं यासंदर्भात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दयेसाठी याचिका दाखल केली. परंतु कोविंद यांनी ती याचिका फेटाळून लावली. राष्ट्रपती कार्यालयानं याबाबत गृह मंत्रालयाशीही विचारविनिमय केला. त्यानंतर रामनाथ कोविंद यांनी हा निर्णय घेतला. 

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंद