दहशतवादी जुनैद मट्टूचा खात्मा

By admin | Published: June 16, 2017 05:32 PM2017-06-16T17:32:44+5:302017-06-16T19:24:00+5:30

कुलगाम येथे झालेल्या चकमकीमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सीआरपीएफला यश आले असून यामध्ये लष्कर ए तय्यबाचा डिस्ट्रीक्ट कमांडर जुनैद मट्टूलाही ठार करण्यात आले आहे.

The death of militant Junaid Mattoo | दहशतवादी जुनैद मट्टूचा खात्मा

दहशतवादी जुनैद मट्टूचा खात्मा

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि.16- शुक्रवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सीआरपीएफला यश आले असून यामध्ये लष्कर ए तय्यबाचा डिस्ट्रीक्ट कमांडर जुनैद मट्टूलाही ठार करण्यात आले आहे. मट्टूसह मृत्युमुखी पडलेल्या दहशतवाद्याचे नाव मुझम्मिल असल्याचे सांगण्यात आले आहे. अनंतनाग जिल्ह्यामधील अरवनी गावामध्ये जुनैद आणि त्याच्या दोन साथीदारांना भारतीय सैन्यदल, सीआरपीएफ आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी एकत्रित प्रयत्न करुन कोंडीत पकडले होते.
 
सुमारे आठ तास चाललेल्या या चकमकीमध्ये जुनैद व मुझम्मील ठार झाले तर त्यांच्या तिसऱ्या साथीदाराला पक़डण्यात आले आहे. जुनैदने मागील वर्षी पोलिसांच्या वाहनावर केलेल्या हल्ल्यामध्ये तीन पोलीस मृत्युमुखी पडले होते. जुनैद गेली दोन वर्षे सक्रीय झाल्याचे सांगण्यात येत असून त्याच्यावर दहा लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. गेल्या वर्षापासून भारतीय सैन्याला मिळालेले हे तिसरे यश आहे. बुरहान वानी, त्याचा साथीदार सब्जर अहमद भट यांच्यानंतर मट्टूला मारण्यात यश आले आहे. मट्टूने वयाच्या 18 व्या वर्षी दहशतवादी संघटनेत प्रवेश केला होता असे सांगण्यात येते. काश्मीर खोऱ्यामध्ये जाहीर करण्यात आलेल्या 12 वॉंटेड दहशतवाद्यांच्या यादीमध्ये जुनैदचा समावेश होता.
 
भारतीय लष्कर आणि पोलिसांना लक्ष्य बनवण्यात येण्याच्या दहशतवाद्यांच्या धमकीनंतर दुस-याच दिवशी म्हणजे काल गुरुवारी एक हल्ला करण्यात आला. गुरुवारी दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यात केलेल्या हल्ल्यात एक पोलीस कर्मचा-याची हत्या करण्यात आली.सूत्रांच्या माहितीनुसार, कुलगाम जिल्ह्यात बुगंग गावातील पोलीस कर्मचारी स्वतःच्या घराबाहेर उभा होता. त्याच वेळी दहशतवाद्यांनी तिथे पोहोचून पोलीस कर्मचा-यावर गोळीबार केला. या गोळीबारात पोलीस कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाला. त्यानंतर धमकी देत दहशतवादी फरार झाले. जखमी पोलीस कर्मचा-याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. बुधवारी लष्करच्या स्थानिक कमांडरनं व्हिडीओ प्रसिद्ध करत पोलीस कर्मचा-यांना धमकी दिली होती. त्यानं पोलीस वर्दी सोडून दहशतवादी मार्ग स्वीकारण्याचं आवाहन केलं होतं. तसेच पोलीस, जवान आणि अधिका-यांना आता लक्ष्य करण्यात येईल, असंही बजावलं होतं. दहशतवाद्यांना पैसे देणे आणि मुजाहिद्दीन, हुर्रियतला साथ देण्याच आवाहन केलं आहे. दहशतवादी संघटन हिजबुल मुजाहिद्दीननेही मंगळवारी दहशतवादी हल्ल्याला जबाबदार धरत हिज्ब कमांडर सब्जार यांच्या हत्येचा बदला घेतल्याचं सांगितलं आहे.

Web Title: The death of militant Junaid Mattoo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.